जानेवारीमध्ये भोपाळमधून एक धक्कादायक घटना समोर आली होती. मेव्हणीने जिंकलेल्या पैशांसाठी एक पती त्याच्या पत्नीला त्रास देत होता. दरम्यान आता या पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
(सांकेतिक फोटो)
भोपाळ, 16 मार्च: केबीसीमध्ये नशीब आजमावण्यासाठी अनेकजण जातात. आपल्या बुद्धीच्या जोरावर अनेकजण यशस्वी देखील होतात. पण या यशाबरोबरच काही भयावह घटना देखील या व्यक्तींत्या वाट्याला येतात. अशीच काहीशी घटना केबीसीमध्ये पैसे जिंकणाऱ्या तरुणीच्या बहिणीबरोबर घडली आहे.
यावर्षी जानेवारी महिन्यात भोपाळमधील (Bhopal News) एका महिलेने तिच्या नवऱ्याविरोधात शोषणाची तक्रार दाखल केली होती. तिच्या बहिणीला केबीसीमध्ये (Kaun Banega Crorepati KBC) मिळालेल्या पैशांची मागणी करत हा इसम तिला त्रास देत होता. याप्रकरणी तिने तक्रार देखील केली होती. दरम्यान या व्यक्तीने आता सदर महिलेला या कारणास्तव तीन तलाक (Triple Talaq) दिला आहे आणि त्यांचा सहा वर्षांचा निकाह (Nikah)संपुष्टात आला आहे. महिलेच्या कुटुंबासमोर त्याने तिला तलाक दिला. महिलेच्या तक्रारीनंतर या नवऱ्याविरोधात तलैया पोलिसांनी मुस्लिम विवाह कायद्यांअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
या महिलेच्या बहिणीने कौन बनेगा करोडपतीमध्ये 50 लाख रुपये जिंकले होते. पोलिस स्टेशन प्रभारी डीपी सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, गिनोरी भागात राहणा 36 वर्षीय महिलेचा निकाह मार्च 2015 मध्ये सय्यद नादिर हुसेनशी झाला होता.
(हे वाचा-लग्न होऊन 5 महिने झाले तरी बायको काही जवळ येईना; मेडिकल चाचणीत फुटलं बिंग )
2012 साली या महिलेच्या बहिणीने केबीसीमध्ये 50 लाख रुपये जिंकले. या रकमेतून हुंडा मिळवण्यासाठी नादिर तिला त्रास देत, असा आरोप त्याच्यावर करण्यात येत आहे. नादिर आणि त्याच्या कुटुंबीयांनी या महिलेला हुंड्यासाठी त्रास दिल्याची तक्रार या महिलेने दाखल केल्यानंतर या प्रकरणाची चौकशी पोलिसीनी सुरू केली होती. दरम्यान आता नादिरने सदर महिलेस तलाक दिल्याने त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 Comments