खिवसिंहची काही दिवसांपूर्वी फेसबुकवरील प्रियंका कुमार नावाच्या एका महिलेसोबत मैत्री (Facebook Friendship) झाली. याच गोष्टीचा फायदा प्रियंकानं घेतला आणि दहा लाखाची फसवणूक केली.
बई 13 मार्च : सोशल मीडियाद्वारे होणाऱ्या ऑनलाईन फसवणुकीच्या (Online Fraud) घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशात आता जोधपूरचा एक व्यक्ती ऑनलाईन फसवणुकीला बळी पडला आहे. या प्रकरणात त्याला 10 लाखाचा गंडा बसला आहे. जोधपूरच्या संजय कॉलनीमधील रहिवासी असलेल्या सेवानिवृत्त सैनिक खिवसिंहची काही दिवसांपूर्वी फेसबुकवरील प्रियंका कुमार नावाच्या एका महिलेसोबत मैत्री (Facebook Friendship) झाली.
एक दिवशी प्रियंकानं सांगितलं, की माझे चुलते वाळूचं काम करतात. त्यांनी काम करताना एक चमकणारा धातू मिळाला. तपास केला असता ते सोनं असल्याचं समजलं. आम्हाला भीती वाटतीये की हे सोनं आमच्याकडून कोणीतरी लुटून किंवा चोरी करुन घेऊन जाईल. त्यामुळं, तुम्ही हे सोनं घ्या, हे सोनं आम्ही तुम्हाला स्वस्तात देईल.
यानंतर खिवसिंह प्रियंकाच्या म्हणण्यानुसार, आसाममध्ये पोहोचले, तिथेच प्रियंका त्याला घ्यायला आली. याठिकाणी खिवसिंहला प्रियंकाचे चुलचे भेटले. त्यांनी सोन्याच्या धातुचा एक तुकडा कापून खिवसिंह यांना दिला. खिवसिंह हा तुकडा घेऊन जोधपूर आला आणि सोनाराकडून याची तपासणी केली. तेव्हा त्याला समजलं की हे सोनंच आहे. यानंतर काही दिवसात प्रियंकाचा फोन आला आणि ती म्हणाली, की २ किलो ३०० ग्रॅम सोन्याचे चुलते २० लाख मागत आहेत. मात्र, तुम्हाला १० लाखात देईल.
हे ही वाचा -नोकरीसाठी पैसे आणि शरीरसुखाची मागणी, जिल्हा परिषदेतील धक्कादायक प्रकार
यानंतर ११ फेब्रुवारीला खिवसिंह आसाममध्ये गेले आणि १० लाख रुपये देवून तो धातू खरेदी केला. या धातूची सोनाराकडे तपासणी केली असता हे सोनं नसल्याचं समोर आलं. यानंतर खिवसिंहनं प्रियंकाच्या सगळ्या नंबरवर फोन केला मात्र तिचा फोन बंद होता. यानंतर त्यांनी प्रतापनगर ठाण्यात आपल्यासोबत झालेल्या या फसवणुकीसाठी रिपोर्ट दाखल केला. याप्रकरणी सध्या तपास सुरू आहे.
0 Comments