-->

Ads

Double Murder: एकतर्फी प्रेमात तरुणी आणि तिच्या आईची निर्घृण हत्या, आरोपी फरार

एकतर्फी प्रेमात तरुणानं केवळ मुलीचीच नाही तर तिच्या आईचीही हत्या (Double Murder) केली आहे. 


युवकानं एकतर्फी प्रेमातून (One-Sided Love)16 वर्षीय कामिनी आणि तिची आई शारदा देवा (वय 45) यांची चाकूनं भोकसून हत्या केली आहे. आग्रा 09 मार्च : एकतर्फी प्रेमात अनेकदा लोक टोकाचं पाऊल उचलतात. या घटना आता नवीन नाहीत. मात्र, आग्रामध्ये घडलेल्या अशाच एका घटनेत तरुणानं केवळ मुलीचीच नाही तर तिच्या आईचीही हत्या (Double Murder) केली आहे. ही घटना आहे आग्रामधील बाह परिसरातील कसबा जरार येथील. रविवारी रात्री एका युवकानं एकतर्फी प्रेमातून (One-Sided Love)16 वर्षीय कामिनी आणि तिची आई शारदा देवा (वय 45) यांची चाकूनं भोकसून हत्या केली आहे. आरडाओरडा ऐकून मदतीसाठी आलेल्या



 कामिनीच्या वहिनीवरही आरोपीनं चाकूनं वार केला आहे. कामिनीच्या वहिनीनं आपल्या मुलांसोबत खोलीत जात आपला जीव वाचवला आहे. आई आणि मुलीची हत्या केल्यानंतर हा आरोपी घटनास्थळावरुन फरार झाला. जागतिक महिला दिनीच झालेल्या या दोन महिलांच्या हत्येनं परिसरात एकच खळबळ उडाली. आयजी ए. सतीश गणेश आणि एसएसपी बबलू कुमार यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. आरोपीचा शोध घेण्यासाठी 5 टीम तयार केल्या गेल्या आहेत.जरार येथील रहिवासी असलेल्या शारदा देवी यांची मुलगी कामिनी अकरावीची विद्यार्थीनी होती. आरोप आहे, की गोविंद मागच्या एका वर्षापासून तिच्या मागे लागला होता. बाह पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक विनोद कुमार यांच्या म्हणण्यानुसार, 20 दिवसांपूर्वीच कामिनीचं लग्न जमलं होतं. दोन वर्षानंतर तिचं लग्न केलं जाणार होतं. रविवारी रात्री शारदा देवी आणि कामिनी आपल्या घरामध्ये झोपल्या होत्या. मुलगा राहुलची पत्नी तिच्या पाच महिन्याच्या मुलासोबत आपल्या खोलीत झोपली होती. राहुल कामानिमित्त दिल्लीला
गेलेला होता. शारदा यांचा दुसरा मुलगा मनीष जवळच राहाणाऱ्या आपल्या चुलत्यांच्या घरी झोपण्यासाठी गेला होता. सोमवारी मध्यरात्री जवळपास पावणे तीनच्या दरम्यान गोविंद घराच्या छतावरुन घरात घुसला. त्यानं आधी शारदा यांच्यावर चाकूनं वार केले. त्यांचा आवाज ऐकून कामिनीही झोपेतून उठली. यानंतर आरोपीनं कामिनीवरही वार केले. जखमी अवस्थेत कामिनीनं दरवाजाकडे धाव घेतली. शारदा देवीही दरवाजाजवळ येऊन पडल्या. तर, कामिनी घरापासून 10 पाऊलं दूर जाऊन कोसळली. ओरडाओरडा ऐकून शारदा यांची सून रेखा बाहेर आली तेव्हा गोविंदनं तिच्यावरही चाकूनं वार केला. मात्र, रेखानं आरोपीला धक्का देत आपला जीव वाचवला आणि खोलीचा दरवाजा लावून आतमध्ये बसली. कामिनीचा आवाज ऐकून परिसरातील लोक जमा झाले. यानंतर

 

आरोपीनं याठिकाणाहून पळ काढला. लोकांनी माहिती देताच 15 मिनीटात पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी तपास केला मात्र आरोपी घरात आढळून आला नाही. आता पोलिसांनी त्याच्या वडीलांना ताब्यात घेतलं आहे. सतीश गणेश यांनी सांगितलं, की गोविंद नावाच्या तरुणानं ही हत्या केली असून तो कामिनीवर एकतर्फी प्रेम करायचा. त्याच्या अटकेसाठी 5 टीम कामावर लावल्या गेल्याचंही त्यांनी सांगितलं.

Post a Comment

0 Comments