-->

Ads

प्लास्टिक विक्री करणाऱ्यांवर होणार गुन्हे दाखल

 प्रतिबंधित प्लास्टिक विक्री करणे, साठवणूक व वाहतूक करण्यास राज्यात बंदी असताना शहरात सर्रासपणे प्लास्टिक कँरीबँगचा वापर होताना दिसत आहे. 

मनपा आयुक्त बिपीन वर्मा  यांनी जेव्हा पदभार स्विकारला होता त्यावेळी शहरात प्लास्टिक कँरीबँग विरोधात धडक मोहीम हाती घेतली होती. पण कोरोनाकाळात मोहीम थंडावली असून  आता शहरात प्रतिबंधित प्लास्टिक विक्री करणाऱ्यांवर दंडात्मक व जप्तीची  कारवाई  महापालिका आणि  महाराष्ट्र प्रदूषण मंडळ संयुक्तपणे करत होते , तीन वेळेस दंड केलेल्या दुकानावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होणार असल्याचे नियम असताना देखील ठाणे महापालिकेचे काही भ्रष्ट अधिकारी या दुकान मालकांकडून सर्रास हफ्ते घेत असल्याची बाब समोर आली आहे ,ठाण्यातील मानपाडा आणि माजिवडा प्रभाग समिती वरील हाकेच्या अंतरावर असलेल्या ढोकाळी येतील हीनाला स्वीट्स मध्ये सर्रास प्लास्टिक पिशवीचा वापर होत असून या कडे ठाणे महापालिकेतील अधीकारी दुर्लक्ष्य करीत आहे ,येणार होळी सण पाहता येतील मिठाई दुकानदार आपल्या ग्राहकाला पालिकेची बंदी असताना देखील प्लास्टिक पिशव्या सर्रास पणे विकत आहे ,ठाणे पालिकेची अधिकाऱ्यांना दरमहा २५ हजार रुपयांची पेशगी हा दुकान मालक देत असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे , महापालिका व महाराष्ट्र प्रदूषण मंडळ संयुक्तपणे इतर दुकानांवरील कारवाई  करणारे आणि प्लास्टिक जप्त करणारे अधिकारी या दुकान वर कारवाई करतील का व या दुकान वर वरद हस्त ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांवर पालिका  प्रशासन काय कारवाई करते या  कडे सुज्ञ ठाणेकरांचे लक्ष्य लागलं आहे

Post a Comment

0 Comments