-->

Ads

मुंबई हादरली! मैत्री तोडली म्हणून तरुणाने युवतीसह तिच्या आईवर चाकूने केले वार

 

Crime in Mumbai: एका युवकासोबत झालेली मैत्री काही कारणांमुळे तोडणं एका युवतीच्या जीवावर बेतलं आहे. एका युवतीने मैत्री तोडली म्हणून संतापलेल्या युवकाने मैत्रिणीसह तिच्या आईवर (Man attack on female friend and her mother) धारदार चाकूने जीवघेणा हल्ला (Man attack with knife) केला आहे.


मुंबई, 16 मार्च: एका युवकासोबत झालेली मैत्री काही कारणांमुळे तोडणं एका युवतीच्या जीवावर बेतलं आहे. एका युवतीने मैत्री तोडली म्हणून संतापलेल्या युवकाने मैत्रिणीसह तिच्या आईवर (Man attacked female friend and her mother) धारदार चाकूने जीवघेणा हल्ला (Man attacked with knife) केला आहे. या दोघींवर त्याने अनेक वार केले आहेत. यानंतर सदर आरोपीने विष प्राशन (Accused drink poison) करून स्वतःही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना मुंबईच्या वसई परिसरात घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून जखमी युवतीला व तिच्या आईला रुग्णालयात दाखल केलं आहे. याप्रकरणी पोलीस घटनेचा अधिक तपास करीत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, 29 वर्षीय पीडित तरुणी मुंबईतील वसई एव्हरशाईन याठिकाणी राहते. आज सकाळी ती तिच्या आईसोबत असताना तिच्या मित्राने घरात प्रवेश करून अचानक हल्ला केला. आरोपी तरुणाने धारदार चाकुने संबंधित तरुणीवर आणि तिच्या आईवर अनेक वार केले आहे. या घटनेतर त्याने स्वतः विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

आरोपी तरुण हा जखमी तरुणीचा जवळचा मित्र आहे. गेल्या काही काळापासून त्या दोघांचे मैत्रीचे संबंध होते. पण काही कारणांमुळे दोघांच्या मैत्रीला तडा गेला. यामुळे तरुणीने आरोपी तरुणाशी असलेले मैत्रीचे संबंध तोडले. याचाच राग मनात धरून आरोपी तरुणाने तिच्यावर हल्ला केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या हल्ल्यात संबंधित तरुणी आणि तिची आई दोघीही गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या घटनेनंतर आरोपी तरुणाने देखील विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्यावरही देखील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संबंधित आरोपी तरुणाची प्रकृती सामान्य झाल्यानंतर त्याची चौकशी केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments