-->

Ads

हदगांव पालिकेकडून महिला दिनानिमित्त महिलांसाठी सिनॅरिटी पॅड मशीनचे उदघाटन..

हदगांव :- महिला दिनाचे औचित्य साधून तसेच महिलांच्या आरोग्याचा विचार करून हदगांव शहरात  महिलांसाठी दोन ऍटोमॅटिक मशीनचे उदघाटन पालिकेच्या नगराध्यक्षा सौ. ज्योतीताई राठोड तसेच पालिकेत नव्याने रुजू झालेले प्रभारी मुख्यधिकारी श्री. डी. एन जाधव यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. 


प्रतिनिधी शुभम तुपकरी हदगांव- नांदेड

शहरातील वर्दळीच्या ठिकाणी म्हणजे बसस्टॉप, आठवडी बाजार आदी ठिकाणी शहरातील आणि बाहेरगावच्या महिलांची नेहमी वर्दळ आणि त्यांची सुरक्षितता लक्ष्यात घेता या दोन ठिकाणी महिलांना अगदी माफक म्हणजे केवळ पाच रुपयात सिनॅरिटी पॅड उपलब्ध होणार असून या मशीन मध्ये पाच रुपयाचे नाणे टाकले की आपोआप पॅड उपलब्ध होणार आहे त्यामुळे महिलांना अगदी स्वस्त दरात पालिकेकडून पॅड उपलब्ध करून दिल्याने महिलावर्गा मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

जागतिक महिला दिनानिमित्त पालिकेत बचत गटातील महिलांना निमंत्रित करून महिला दिन साजरा करण्यात आला आणि हेच औचित्य साधून सिनॅरिटी पॅड मशीनचे उदघाटन करण्यात आले दोन्ही मशीन दोनदिवसात हदगांव बसस्थानक आणि आठवडी बाजार परिसरात ठेवण्यात येणार आहेत त्याचा सर्व महिलांनी लाभ घ्यावा असे अहवान उपस्थितांनी केले आहे.

यावेळी पालिकेचे स्वछता विभागाचे प्रमुख सतीश देशमुख, अभियंता संदीप मत्ते, सहायक प्रकल्प अधिकारी बोरकर एस.ए, शहर स्वच्छता समन्वयक करण चव्हाण , माविमचे क्षेत्रीय समन्वयक ओंकार हंडेवार,पत्रकार पंडितराव पतंगे, पत्रकार दयानंद कदम, सह्योगीनी आशा वाकडे, सुरेश गिरबिडे, शेख अझीम, मामीडवारताई, सिद्धार्थ पंडित, हदगांव CLF अध्यक्ष प्रतिभा पेन्नेवार, सचिव अलका राठोड, भाग्यश्री भोसकर, प्रविणा चिल्लरगे, लक्षमीबाई दवणे,सीमा नलावडे,वर्षाताई पांडे,  जयश्री खानजोडे, आदी बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या.





Post a Comment

0 Comments