अर्ध्या तासापासून मनोहर आणि अलका यांच्यातील प्रणयाची क्रीडा आता चांगलीच रंगत होती. शरीर सुखाच्या एका परमोच्च आनंदाच्या टोकाला गाठण्यासाठी दोघे आतूर झाले होते. दोघेही एकमेकांना जोमाने प्रतिसाद देत शरीर सुखाचा आनंद लुटू लागले. त्यांना सार्या विश्वाचा विसर पडला होता, मात्र परमोच्च आनंदाच्या त्या शेवटच्या क्षणावर येऊन ठेपत असतांनाच अचानक प्रत्यक्षात अलकाचा पती समोर उभा ठाकला. त्याला पहाताच तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तिने यातून सावररण्याचा प्रयत्न केला, मात्र मनोहर काही केल्या थांबेना. हे पाहून तिच्या पतीचा रागाचा पारा चढला. तोे शिव्यांची लाखोली वाहू लागला. तसा मनोहर भानावर आला. काय करावे त्याला सुचेना, कपडे कसेबसे अंगावर चढवत तो थेट टेरेसवरून पळू लागला. निकर घालून पळण्याच्या प्रयत्नात असतांना त्याचा तोल गेला आणि तो टेरेसच्या उंचीवरून धपकन खाली पडला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन अती रक्तस्त्रावामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. हा मनोहर भंडारा जिल्ह्यातील पोलीस दलात कर्मचारी असल्याने खळबळ माजली आहे.
०००
भंडारा जिल्ह्यातील गणेशपूर येथे अनेक दिवसांपासून मनोहर हा रहात होता. पोलीस दलामध्ये कार्यरत असल्याने त्याचे परिसरात येणे-जाणे होते. ड्युटी भली आणि आपण भले असेच त्याचे होते, मात्र मध्यतंरी तपास कामाच्या निमित्ताने फिरत असतांनाच त्याची भेट अलकाशी झाली. तारूण्याच्या उंबरठ्यावरच येऊन ठेपलेल्या अलकाला पाहून त्याला भूल पडली. तिच्या कामुक नजरेने तो पुरता घायाळ झाला. त्याने वयाची चाळीशी गाठली होती. घर-संसार, मुले होती. जबाबदारीची, समाजात प्रतिष्ठा असणारी नोकरी होती. सारे सुरळीत सुरू होते, पण त्याला अलकाचा मोह पडला. त्याच्या नजरेसमोरून ती हलत नव्हती. दिवस-रात्र तिचेच विचार त्याच्या मनात घोळू लागले. तसा तो उत्तेजित होत गेला. या वयातही आपण प्रेमात पडू शकतो याचा त्यालाही विश्वास बसेना, मात्र अलकाच्या त्या रूपाने हे सारे काही वास्तवात उतरले होते. तो तिच्याच दर्शनासाठी परिसरात ये-जा करू लागला. नित्याच्या या जाण्या-येण्यातून त्याने अखेर अलकाशी संवाद साधला. तो पोलीस कर्मचारी असल्याने तिनेही त्याच्याशी न संकोचता गप्पा मारण्यास सुरूवात केली. ती सुशिक्षित-सधन घरातील होती, त्यामुळे तिच्या बोलण्यात-वागण्यात मोकळेपणा होता. हीच गोष्ट त्याला तिच्याकडे आकर्षित करत होती. तिच्या मादक रूपाने, गोड बोलण्याने तो तिच्यावर ङ्गिदा झाला. तर तो पोलीस असल्याने तिलाही त्याच्याबद्दल आदर वाटत होता. या आदराचा गैरङ्गायदा घेत त्याने तिच्याभोवती जाळे टाकण्यास सुरूवात केली.
तो विवाहित होता, दोन मुलांचा बाप होता. त्याची पत्नी काही दिवसांपासून माहेरी रहात होती, त्यामुळे त्याचे सगळे लक्ष आता अलकावरच स्थिरावले होते. ड्युटीच्या निमित्ताने तो वारंवार त्या भागात जात असे, तिला भेटत असे. त्याने बोलता-बोलता तिचा सगळा अंदाज घेतला. ती घरात एकटीच मुलांसह रहाते, तिचा नवरा कामानिमित्त बाहेर असतो हे त्याच्या लक्षात आले. तसा त्याने डाव खेळण्यास सुरूवात केली. ‘तुम्हाला काहीही मदत लागल्यास मला सांगा’ असे त्याने तिला सांगितले. तो पोलीस होता, वयाने चाळीशीचा होता, घर-संसार असणारा गृहस्थ होता. त्यामुळे त्याच्यापासून काही धोका आहे असे तिला वाटले नाही. तिनेही त्याच्याशी आदरातून आपुलकीचे नाते जोडले, पण हेच नाते किती महागात पडणार आहे याची तिला जाणीव नव्हती.
दोघे नेहमीच भेटत होते, ङ्गोनवरून ते एकमेकाच्या संपर्कात होते. दोघांचेही जोडीदार दूर असल्याने या दोघात जवळीक वाढली. दोघे एकमेकाला सुख-दु:ख सांगू लागले. आपसुकच दोघांच्या मनात एकमेकाविषयी लळा निर्माण झाला. दोघांनाही आपल्या मनातील दुःख वाटून घ्यायला आधार मिळाला होता. दोघांनाही एकमेकाच्या स्वभावाची चांगलीच ओळख झाली. एकमेकाबद्दल प्रेम वाटू लागले. एकदा बोलता-बोलता त्याने आपल्या एकाकीपणाचे दु:ख तिच्यासमोर मांडले. वास्तविक ते दोघे विवाहित होते, त्यांनी संयम दाखवायला हवा होता. तो पोलीस दलात होता, अनैतिकतेचा शेवट कसा होतो याची त्याला कल्पना होती. पण वासनेच्या आहारी गेल्यामुळे त्याला कशाचे भान राहिले नव्हते. आपण पोलीस आहोत, आपल्याला कोण काय करतेय असा त्याचा अविर्भाव होता. तो रूबाबात येत असे आणि तिच्याशी संबंध ठेवत असे. सुरूवातीला एका पोलिसाशी ओळख आहे, हे बरेच झाले असे तिच्या पतीला वाटत होते, पण या पोलिसाचे वागणे चांगले नाही, त्याने आपल्या बायकोलाच ङ्गशी पाडले आहे अशी कुजबुज त्याच्या कानावर गेली, तेंव्हा मात्र तो हबकला. पण पोलिसाच्या वयाचा विचार करून त्याने सुरूवातीला लक्ष दिले नाही. त्याच्या बायकोबरोबर त्या पोलिसाचे संबंध आहेत ही चर्चा परिसरात जास्तच रंगू लागली, तेंव्हा मात्र तो सावध झाला. त्याने पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचा प्रयत्न केला, पण त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. मात्र त्या पोलिसाचे घरी येणे-जाणे कमी झाले ही एक तिच्या पतीसाठी समाधानाची बाब होती.
जानेवारी महिन्याचे शेवटचे दिवस होते. हवेत गारठा वाढला होता. मनोहरने दारू प्राशन केली होती. डोक्यात दारूचा अंमल वाढू लागला. तसा वासनेचा नाचही सुरू झाला. त्याला अलकाचा मादक देह दिसू लागला. आता तिला भोगल्याशिवाय चैन पडणार नव्हती. त्याने लगेचच तिच्याशी संपर्क केला. तिचा पती, मुले घरात होती, पण मनोहरचा ङ्गोन आल्यानंतर तिच्याही उत्तेजना वाढल्या. तीही संभोगासाठी तयार झाली. दोघांचे ठरले आणि तो टेरेसवर पोहचला. तीही काही वेळातच टेरेसवर आली. चांदणे पसरले होते. हवेतील गारठा वाढू लागला होता. ती गडबडीत टेरेसचा दरवाजा बंद करणे विसरून गेली. त्याला पहाताच उत्तेजित झालेली अलका थेट त्याच्या मांडीवर जाऊन बसली. त्यानेही तिला आवळले. तो तिच्या नाजूक शरीराला कुस्करू लागला. तिची चुंबने घेऊ लागला. पोटात दारू आणि मिठीत तरणीबांड बाई यामुळे तो चांगलाच तापला होता. तो तिला ओरबाडू लागला. तीही त्याला सुस्कारे सोडत साथ देऊ लागली. त्याने तिला तशीच झोपवली आणि तिच्यावर स्वार झाला. तो जोरजोरात तिच्याशी संभोग करू लागला. त्याचा जोर चांगलाच वाढला होता. थंडीतही त्या दोघांना घाम येऊ लागला होता. इतक्यात टेरेसचा दरवाजा उघडल्याचा आवाज झाला. ती सावध झाली. तिने दरवाजाकडे पाहिले, तर तिचा पतीच येत होता. तशी तिची पाचावर धारण बसली. ती मनोहरला अंगावरून बाजूला करू पहात होती, पण तो चांगलाच रंगात आला होता. त्याचा जोर वाढला होता. त्याला कशाचीच जाणीव उरली नव्हती. तो भान हरपून संभोगात मग्न होता. आपली बायको परपुरूषांबरोबर संभोग करते हे पाहून तिच्या नवर्याला पारा चढला. त्याने मनोहरला धक्का देऊन शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. तसा मनोहर भानावर आला. आपली चोरी पकडली गेली हे पाहून तो बिथरला. अंगावरचे कपडे कसेबसे सावरत तो टेरेसच्या कठड्यावरून धावत होता. धावतच निकर घालण्याची त्याची धडपड सुरू होती. तसाच लगबगीने तो पाईपवरून उतरण्याचा प्रयत्न करत असतांना त्याचा तोल गेला. क्षणार्धात वरच्या मजल्यावरून खोली कोसळला, त्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अतिरक्तस्त्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला
एक पोलीस कर्मचारी, विवाहित पुरूष असूनही परस्त्रीच्या नादाला लागला आणि जीव गमावून बसला. या प्रकरणाने जिल्ह्यात खळबळ माजवली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. मात्र अनैतिक संबंधातून विनाश अटळ असतो, हे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे.
0 Comments