-->

Ads

नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदी माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांची बिनविरोध निवड

हदगांव:- महा विकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांची बिनविरोध निवड झाली आहे गेल्या आठ दिवसापासून सोशल मीडियावर या निवडणुकीच्या बाबतीत तर्कवितर्कांना उधाण आले होते बहुतांश पोस्टरवर नागेश पाटील यांची संचालक पदी एक तर्फी वर्णी लागणार हे जवळपास निश्चित झाले होते काही दिवसापूर्वी माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांनी त्यांच्या शेतात मतदारांची बैठक घेतली असता जवळपास 80 टक्के मतदार या मिटींगला हजर होते आणि त्यांनी नागेश पाटील यांच्या बाजूने कल दर्शविला होता 



प्रतिनिधी शुभम तुपकरी हदगांव- नांदेड


त्याच दिवशी नागेश पाटील यांचा विजय निश्‍चित झाला होता कारण साठ पैकी एकेचाळीस मतदार या बैठकीत उपस्थित होते हादगाव तालुक्यातील जास्तीत जास्त ग्रामपंचायत शिवसेनेच्या आल्या असल्याने या निवडणुकीत नागेश पाटील आष्टीकर यांना त्यांचा फायदा झाला अशी सामान्य नागरिकांतून चर्चा आहे नागेश पाटील आष्टीकर यांची या संचालक पदी निवड झाल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांच्या सर्व समस्या सोडवल्या जातील आणि बँकेला पूर्वीचे गतवैभव प्राप्त होईल अशी आशा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे या विजयामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले असून कार्यकर्त्यांनी हादगाव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौका च्या समोर फटाक्यांची आतिषबाजी करुन नागेश पाटील आष्टीकर यांचे हदगाव शहरामध्ये जोरदार स्वागत केले यावेळेस शिवसेनेचे हदगाव तालुका प्रमुख शामराव चव्हाण, बजरंग भरकड, राहुल भोळे, नगरसेवक प्रतिनिधी मुधोळकर सर, नगरसेवक प्रतिनिधी किशोर भोस्कर, ओम ऑटोमोबाईल्स चे मालक मोतीराम शिंदे, नगरसेवक बाळा माळोदे, यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते

Post a Comment

0 Comments