रेतीबंदर, मुंब्रा येथे रेल्वे तर्फे सुरु असलेले गर्डर लॉन्चिंग चे काम २४ तासाच्या ब्लॅाक नंतर काल रात्री १२ वा संपणे अपेक्षित होते परंतू रेल्वेच्या या कामातील तांत्रिक अडचणींमुळे अद्याप काम पुर्ण झालेले नसल्याने आणि ते काम आज दिवसभर सुरू राहणार असल्याने मुंब्रा बायपास मार्ग आज वाहतुकीसाठी बंद राहणार असल्याने वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.त्यामुळे शहरात वाहतुकीवर परिणाम झाल्याने मुख्य रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या .
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवार असल्याने सकाळी कामासाठी निघालेल्या चाकरमान्यांना या कोंडीमुळे नाहक त्रासाला सामोरे जावे लागले ही कोंडी सकाळी हळूहळू वाढत शहरात कोंडीचे चित्र पाहण्यास मिळून लागले. त्यातच सकाळी कामानिमित्त वाहने घेऊन बाहेर पडलेल्या चाकरमानी या कोंडीत अडकून पडले होते .खारेगांव टोल नाका येथून रेतीबंदर मार्गे , मुंब्रा बायपास मार्गे कळंबोली , महापे कडे जाणारी वाहतूक आणि जे एन पी टी , नवी मुंबई, कल्याण वरुन खारेगाव कडे येणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली असुन कृपया पर्यायी मार्गाचा वापर करावा असं वाहतूक शाखेचे उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी कळवलं
0 Comments