-->

Ads

घृणास्पद प्रकार; 'इथं राहायचं असेल तर द्रौपदी होऊन राहावं लागेल', नवविवाहितेला पतीची धमकी

 

महिलांच्या बाबतीत विचार करण्याची समाजाची पद्धत अलीकडे दिवसेंदिवस अधिकच विकृत होत चालली असल्याचा घटना सध्या आजूबाजूला घडताना दिसत आहेत.






    अहमदाबाद, 24 मार्च : महिलांच्या बाबतीत विचार करण्याची समाजाची पद्धत अलीकडे दिवसेंदिवस अधिकच विकृत होत चालली असल्याचा घटना सध्या आजूबाजूला घडताना दिसत आहेत. बलात्काराच्या (Rape) घटना तर रोजच कानावर येतच असतात; पण विवाहित महिलांवर(Married Women)घरात होणाऱ्या बलात्कारांचं प्रमाणही मोठं आहे. गुजरातमधल्या (Gujarat)अहमदाबाद (Ahmedabad) शहरात अलीकडेच अशी एक दुर्दैवी घटना घडली. एका नवविवाहितेला तिच्या नवऱ्यानेच सासरे आणि दीराबरोबर शरीरसंबंध ठेवण्याची जबरदस्ती केली. त्यासाठी तिला मारहाणही केली आणि तिने ते स्वीकारलं नाही म्हणून तिला घराबाहेरही काढलं. तिने आपला पती आणि सासरच्या मंडळींविरोधात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल केली आहे.'भास्कर'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.

    पीडितेने तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार,अहमदाबादमधल्या चांदखेडा (Chandkheda)परिसरात राहणाऱ्या त्यामहिलेचं महिन्याभरापूर्वीच मोठ्या धूमधडाक्यात लग्न झालं होतं. नव्या संसाराची स्वप्नं घेऊन सासरी आलेल्या तिला दोन-तीन दिवसांतच आपला स्वप्न भंग होईल,असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. लग्नाला जेमतेम दोन-तीन दिवस झाले, तेवढ्यातच तिचा पती तिला बारीक सारीक कारणांवरून थेट मारहाण करू लागला. त्यामुळे तिला आपण जणू नरकातच आलो आहोत,असं वाटायला लागलं.


    नंतर एके रात्री तिला तिच्या पतीने आपल्या वडिलांच्या म्हणजे तिच्यासासऱ्यांच्या बेडरूममध्ये जाऊन त्यांना शय्यासोबत करायला सांगितलं. हे ऐकल्यावर ती सैर भैरच झाली. तिने त्याला विरोध केला. तेव्हा त्याने तिला धमकी दिली,की इथे राहायचं असेल,तर द्रौपदी बनून राहावं लागेल.

    त्यानंतरकाही दिवसांनी पतीच्या मोठ्या भावानेही तिच्या खोलीत येऊन तिच्यावरजबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. त्याला विरोध केल्यावर त्याने तिला मारहाणकेली. तसंच,हे कळल्यावर तिचा पती आणि सासऱ्यांनीही तिला मारहाण केली आणिघरातून हाकलून दिलं. त्यानंतर पीडितेने पोलिसांत जाऊन तक्रार दाखल केली आहे.

    मूळच्या उत्तर प्रदेशातल्या असलेल्या आणि मुंबईत राहत असलेल्या एका कुटुंबातल्या पीडितेनेही काही कालावधीपूर्वी तिच्यावरच्या अत्याचारांची तक्रार केली होती. तिचा पती आणि सासरे यांनी लग्नापूर्वी हुंड्यासाठी तिच्यावर जबरदस्ती केली. लग्नानंतर पतीने तिच्याशी शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिला. डॉक्टर असलेल्या सासऱ्यांनी तिला कसलं तरी इंजेक्शन दिलं आणि त्यांच्या दोन मुलांनी तिला आडवं पाडल्यावर सासऱ्यांनी तिच्यावर बलात्कार केला.

    समाजातल्या अशा घटना वाढल्या असल्यामुळे तरुणींनीलग्नापूर्वी भावी पतीशी बोलून,त्याच्या कुटुंबीयांबद्दलची पूर्ण माहितीकाढावी,तसंच कायम सतर्क आणि सावध राहावं,असा सल्ला समुपदेशक देतात. तरीहीदुर्दैवाने अन्याय झालाच,तर अजिबात सहन न करता तातडीने पोलिसांत तक्रारदाखल करावी,असं समुपदेशक सांगतात.

    Post a Comment

    0 Comments