-->

Ads

चाचणीच्या नावाखाली नर्सिंगच्या विद्यार्थिंनींसोबत अश्लील कृत्य; प्रायव्हेट पार्टला केला स्पर्श, सेंटर सील

 

या प्रकरणामुळे विद्यार्थिनींच्या पालकांनी राग व्यक्त केला आहे




खूंटी, 14 मार्च : झारखंडच्या खूंटीमध्ये (Khunti) नर्सिंग विद्यार्थिनींसोबत छेडछाड प्रकरण समोर आलं आहे. आरोपानुसार संस्थानच्या कोषाध्यक्षांनी सहनशक्ती टेस्ट (Endurance Test) करण्याच्या नावाखाली विद्यार्थिनींना चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना तिरला येथील नर्सिंग ट्रेनिंग सेंटरमध्ये घडली आहे. (Obscene acts with nursing students in the name of testing; Touched private part, center seal) या प्रकरणात आरोपी कोषाध्यक्ष परवेज आलम उर्फ बबलू याच्याविरोधात खूंटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी पोलिसांनी त्याला अटक करीत तुरुंगात पाठवलं आहे. शनिवारी हे प्रकरण समोर आल्यानंतर खूंटी बीडीओ सविता सिंह आणि खूंटी महिला ठाण्याच्या प्रभारी दुलारमनी टुडूने नर्सिंग ट्रेनिंग सेंटर पोहोचून प्रकरणाचा तपास केला.

पीडित विद्यार्थिनींची चौकशी केल्यानंतर बीडीओने सांगितलं की, संस्थानच्या कोषाध्यक्षांच्या कृत्यामुळे सेंटरच्या मुली घाबरल्या आहेत. त्यांना आपल्या भविष्याची चिंता आहे. विद्यार्थिनींनी आरोप केला आहे की, पल्स चेक करण्याच्या बहाण्याने कोषाध्यक्षाने त्यांच्या गुप्तांगाला हात लावला. त्यानंतर प्रकरण दाबण्यासाठी त्यांना धमकीही दिली. या प्रकरणात खूंटी जिल्हा प्रशासन गंभीर असून जिल्ह्याचे उपायुक्त शशी शेखर आणि एसपी आशूतोष शेखर यांनी दोषीवर कडक कारवाई करण्याचा विश्वास व्यक्त केला. पोलिसांनी प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता, चौकशीचे निर्देश दिले आहेत. एनजीओच्या माध्यमातून चालविल्या जाणाऱ्या नर्सिंग ट्रेनिंग सेंटरमध्ये सध्या 60 विद्यार्थिनी प्रशिक्षण घेत आहेत. 60 विद्यार्थिनींमध्ये 58 खूंटी जिल्ह्यातील राहणारी आहेत. तर दोन विद्यार्थिनी गुमला येथे राहणारी आहेत.

Post a Comment

0 Comments