या हत्येत आणखी कुणाचा सहभाग आहे का? याचा तपास पोलीस करत आहे. आरोपी महिलेला मृतकापासून 8 वर्षाचा मुलगा होता.
नागपूरच्या गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत 9 मार्च रोजी रजत संकुल या इमारतीच्या प्लॅट क्रमांक 103 मध्ये लक्ष्मण मलिक यांची हत्या झाली होती. हत्येनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झल्यानंतर जे दृश्य पुढे आले तेव्हा पोलिसांच्या देखील पायाखालची वाळू सरकली होती. पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवले.
लक्ष्मण मलिक हे सरकारी सेवेतून सेवानिवृत्त झाले असून सफाई कर्मचारी होते व त्यांची पाच लग्न झाल्याची माहिती पुढे आली होती. सोबतच ते आर्थिक संकटात असल्याचे तपासात पुढे आले. त्यामुळे पोलिसांनी या सर्व बाजूचा विचार करून आरोपीचा शोध सुरू केला. मृतकचा फोन तपासला असता त्याची पाचवी बायको स्वाती ही त्याला शेवटच्या क्षणाला संपर्कात असल्याचे निदर्शनात आले. त्यांनतर पोलिसांनी स्वातीला तपासासाठी बोलावले. सुरवातीला ती उडवाउडवीची उत्तरे देत होती. मात्र, पोलिसांकडे सबळ पुरावे असल्याने तिला खाक्या दाखवताच तिने सर्व हकीकत सांगितली.
पॉर्न व्हिडीओ दाखवून पतीचे हात खुर्चीला बांधले अन् चिरला गळा, नागपुरातील घटना
0 Comments