उमरखेड : यवतमाळ जिल्हातील घनदाट अश्या, विदर्भ आणि मराठवाड्या च्या सीमेवर असलेल्या पैनगंगा अभयारण्यात काल वनविभागाच्या पथकाला गस्त घालत असताना दोन पट्टेदार वाघाचे दर्शन झाले. माहिती नुसार त्यामधील एक नर तर दुसरी मादी आहे.
पैनगंगा अभयारण्यात सध्या जंगली प्राण्याचा वावर वाढला असून वाघ तसेच बिबट्यांमुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे. काही दिवसापूर्वीच तालुक्यातील जेवली येथे अंगणात झोपलेल्या मुलावर वाघाने हल्ला केला होता. तर काल रात्री बिबट्याने ढाणकी जवळील एका शेतात गाईच्या वासरावर हल्ला करून ठार केले.
काल खरबी रेंज मध्ये या दोन वाघाचे दर्शन झाल्याने अभयारण्यातील नागरिक घाबरले असून नागरिकांनी सतर्क राहून जंगलात गुरे घेऊन तसेच लाकडे आणण्यासाठी जाऊ नये असे वनविभागाकडून आवाहन करण्यात आले आहे.
0 Comments