दहावी-बारावीची परीक्षा ही ऑनलाईन की ऑफलाईन होणार या विवंचनेतून मुक्तता झाली असून ही परीक्षा ऑफलाईन होण्याबरोबरच विद्यार्थी शिकत असलेल्या शाळा-महाविद्यालयातच होणार आहे. राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
गेले काही दिवस दहावी-बारावीची परीक्षा ही ऑनलाईन घ्यावी की ऑफलाईन घ्यावी यावरून बरीच चर्चा झडत होती. यामुळं विद्यार्थ्यांचा जीवही टांगणीला लागला होता. मात्र वर्षा गायकवाड यांनी ही परीक्षा ऑफलाईन घेण्याबरोबरच प्रत्येक विद्यार्थ्याच्या शाळेतच ही परीक्षा होईल असा निर्णय जाहीर केल्यामुळं विद्यार्थ्यांचा जीव भांड्यात पडला आहे. दहावी-बारावीच्या परीक्षा या आधी जाहीर केलेल्या वेळेनुसारच होणार असून त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. लेखी परीक्षेनंतर प्रात्यक्षिकांच्या परीक्षा घेतल्या जातील असंही वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. नजिकच्या काळात कोरोना, अथवा लॉकडाऊन अथवा अन्य काही अडचणी निर्माण झाल्यास किंवा विद्यार्थ्यांना कोरोना अथवा त्यांना परीक्षा देता आली नाही तर पुन्हा एकदा ही परीक्षा घेतली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. दहावी-बारावी संदर्भात महामंडळाच्या संकेत स्थळावर जाऊन खात्री करावी, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवा
हनही वर्षा गायकवाड यांनी यावेळी केलं.
0 Comments