-->

Ads

संभाजीनगर शिवसेना उपतालुका प्रमुखाच्या मृत्यूचं गूढ..सुनील खजिनदार यांची हत्या कि आत्महत्या..



                संभाजीनगर : शिवसेना उपतालुका प्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य सुनील खजिनदार (३३) यांचा मृतदेह दौलताबाद गावात एका दुसऱ्या घरात साखळीने टांगलेल्या अवस्थेत आढळून आला. विशेष म्हणजे मयताचे दोन्ही गुडघे हे पलंगावर रखडलेल्या अवस्थेत असल्याने या मृत्यूचं गूढ निर्माण झाल असून हि हत्या आहे कि आत्महत्या याबाबत साशंकता वर्तवली जात आहे. 

                        या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून काही काळ तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे पोलीस बंदोबस्त हि ठेवण्यात आला होता. संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असल्याचे चित्र आहे. 

                      जो पर्यंत संबंधितांवर गुन्हे दाखल करून योग्य ती कारवाई केली जात नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे. 

            दौलताबाद येथील मुजीब कॉलनीत राहणाऱ्या महिलेसोबत शिवसेना उपतालुका प्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य असलेले सुनील प्रकाश खजिनदार (३३) याचे प्रेम संबंध होते. नेहमी प्रमाणे काल दुपारी सुनील खजिनदार हे संबंधित महिलेच्या घरी गेले. महिला हि बाहेर होती सुनील याने घराचे दार बंद करून आत साखळीने गळफास घेतला. महिलेने दार ठोठवले असता दार उघडत नसल्याने परिसरातील नागरिकांनी दार तोडले असता त्यांना सुनील हे लटकलेले दिसले. 

              आत्महत्या केल्याचे कळताच नागरिक मोठ्या प्रमाणावर गोळा झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी सुनील यास बेशुद्धावस्थेत उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

३डी न्यूज संभाजीनगर 

प्रतिनिधी सचिन लकडे 

Post a Comment

0 Comments