गेल्या अनेक दिवसांपासून अंबरनाथ शहरामध्ये शासनाने आखून दिलेल्या नियमावलीनुसार आणि वयोगटानुसार कोविड लस देण्याकरिता सुरवात झाली असून शहरातील अनेक नागरिकांचे लसीकरण झाले आहे.
या लसीकरणानंतर कणकण वाटणे, अंगदुखी या सारखे लक्षणे दिसून येतात. परंतु डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार ही सर्व लक्षणे प्रभावी लसीकरणाचे आहेत.
या सर्व बाबींचा विचार करून जेष्ठ नागरिकांना लसीकरणासाठी येण्याकरिता आणि लसीकरण झाल्यानंतर स्वतःच्या घरापर्यंत जाण्यासाठी काही समस्या जाणवू नये अथवा रिक्षा आणि इतर वाहतूक सेवांच्या शोधमध्ये फिरावे लागू नये या साठी अंबरनाथ शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांनी मोफत कार सेवा सुरू केली आहे. गेले २ दिवस हि सेवा चालू असून ५० अधिक जेष्ठ नागरिकांनी याचा लाभ घेतला आहे. सर्व नागरिकांनी अरविंद वाळेकर आणि अंबरनाथ शिवसेना पक्षाच्या या उपक्रमाचे मोठ्या प्रमाणात प्रशंसा केली आणि आभार मानले.
या उपक्रमामध्ये खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, जिल्हाप्रमुख गोपाळजी लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली व अरविंद वाळेकर यांच्या संकल्पनेतून अंबरनाथ मधील सर्व शिवसेना पदाधिकारी, युवासेना पदाधिकारी, शिवसैनिक आणि युवासैनिक एकत्र काम करत असून जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत ही सेवा पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत.
0 Comments