महाबळेश्वरला अल्पवयीन मुलीवर शिक्षकानेच बलात्कार केल्याची संतापजनक घटना
- महाबळेश्वरला अल्पवयीन मुलीवर शिक्षकानेच बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे.
- या प्रकरणी आरोपी शिक्षकाला सात दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे
महाबळेश्वर : शाळकरी मुलीवर बलात्कार करणाऱ्या महाबळेश्वरमधील नराधम शिक्षक दिपक ढेबे याला न्यायालयाने सात दिवसाची पोलिस कोठडी दिली आहे. त्याने या अगोदर असे काही कृत्य केले आहेत का याची कसून चौकशी केली जात असल्याची माहिती सातारा जिल्हा पोलिस प्रमुख अजयकुमार बन्सल यांनी दिली.
8 मार्च रोजी चाईल्ड हेल्पलाईन नंबर 1098 वर कॉल करुन एका विद्यार्थीनीने महाबळेश्वरातील माकरीया या शाळेतील प्राचार्य एका शाळकरी मुलीवर अत्याचार करत असल्याची माहिती दिली होती. त्या नुसार पोलिसांन पिडीत मुलीचा शोध घेत तीची तक्रार लिहून शाळेतील शिक्षख दिपक ढेबे याला बेड्या ठेकल्या. सातारा जिल्हा पोलिसांनी प्रत्येक शाळेत जाऊन चाईल्ड हेल्पलाईन नंबर 1098 ची माहिती देऊन मुलींमध्ये प्रबोधनाचे काम केले होते. याच्यामुळे हा सर्व प्रकार उघडकीस आला.
दिलीप ढेबे हे महाबळेश्वरातील प्रचलित हायस्कुलचे प्राचार्य आहेत. हायस्कुलमधील शाळकरी विद्यार्थींनीवर शाळेच्या प्रयोग शाळेत बलत्कार केल्याचे उघड झाले आहे. आरोपी दिलीप ढेबे याच्यावर महाबळेश्वर पोलिस ठाण्यात भादंवि 354 अ, 376 क, बालकांचे लैगिंक अत्याचारापासन संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4, 5ओ, 5 पी , 6, 8, 12 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाबळेश्वरला अल्पवयीन मुलीवर तिच्या शिक्षकानेच बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली. याची माहिती चाइल्ड हेल्पलाईनला माहिती मिळताच सातारा पोलिसांनी कारवाई करत नराधमाच्या मुसक्या आवळल्या याबद्दल सातारा पोलिसांचे अभिनंदन. याने अजून मुलींवर असा अत्याचार केला असल्याची शक्यता नाकारतां येत नाही त्यामुळे कसून चौकशी करा, अशी मागणी करत अल्पवयीन मुलांवरचे वाढते अत्याचार पाहूनही सरकारला बाल हक्क संरक्षण आयोगाला अध्यक्ष देण्याची बुद्धी का होत नाहीये? असा सवाल भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी विचारला. काही महिन्यांची 11 बालकं होरपळून मेली तर महाबळेश्वर सारख्या घटना कुठं ना कुठं घडतातचं आहे. राज्यातल्या जनतेने उघड्या डोळ्यांनी अजून किती घटना पहायच्या आहेत? असा प्रश्न चित्रा वाघ यांनी उपस्थित करत महाविकास आघाडीवर टीका केली.

0 Comments