एका 6 वर्षाच्या चिमुकलीचं अपहरण (Minor girl Kidnap) केल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणात आरोपींनी पीडितेच्या घराच्या बाहेर एक नोटीस लिहून तिच्या मोठ्या बहिणीसोबत लग्न लावून देण्याची (Demand to marriage) मागणी केली आहे.
फिरोजाबाद, 09 मार्च: एका 6 वर्षाच्या चिमुकलीचं अपहरण (Minor girl Kidnap) केल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणात पोलीस आणि नातेवाईक मुलीचा शोध घेत आहेत. मात्र अद्याप त्यांना कोणाताही सुगावा भेटला नाही. पण या प्रकरणाने आता वेगळं वळण घेतलं आहे. त्यामुळे कुटुंबीयांच्या चिंता वाढल्या आहेत. याप्रकरणी आरोपींनी पीडितेच्या घराच्या बाहेर एक नोटीस लिहून (Paste notice outside the victims home) अपहरण केल्याचं स्पष्ट केला आहे. त्याने या नोटीसमध्ये अपहरण झालेल्या मुलीच्या मोठ्या बहिणीसोबत लग्न लावून देण्याची (Demand to marriage) मागणी केली आहे. याप्रकरणाने परिसरात खळबळ उडाली असून नातेवाईकांमध्ये दहशतीचं वातावरण तयार झालं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तरप्रदेशातील फिरोजाबाद येथील नगला सेंदलाल या गावात राहणाऱ्या 6 वर्षाच्या हिमांशीचं आज, मंगळवारी अपहरण करण्यात आलं आहे. हिमांशी आपल्या मोठ्या बहिणीसोबत गावपासून दूर असलेल्या आपल्या घरी आली होती. पण रस्त्यावरून जात असताना, 6 वर्षीय हिमांशी अचानक गायब झाली आहे. याप्रकरणी नातेवाईकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलीस या घटनेचा तपास करीत आहेत.
पण अचानक पीडितेच्या घराच्या बाहेर एक नोटीस लावलेली मिळाली असून या नोटीसद्वारे अपहरणकर्त्यांनी त्यांना काय हवं आहे ते, स्पष्ट केलं आहे. अपहरणकर्त्याने या नोटीसमध्ये हिमांशीच्या मोठ्या बहिणीबरोबर लग्न करण्याची मागणी केली आहे. लग्नाची मागणी मान्य केली नाही, तर 6 वर्षीय चिमुकलीला जीवे मारण्याची धमकीही अपहरणकर्त्यांनी दिली आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.
याप्रकरणात पोलीस घराबाहेर नोटीस चिटकवलेल्या व्यक्तीचा शोध घेत आहेत. सध्या पोलिसांनी कुटुंबीयांकडून अपहरण झाल्याची तक्रार नोंदवून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. तसेच घराबाहेर भिंतीवर चिकटलेल्या पत्रात कोणाची नावं लिहिली आहेत, याचा तपास पोलीस करत आहेत. शिकोहाबाद पोलीस ठाण्याचे सीईओ बलदेव सिंह यांनी सांगितलं की, संबंधित घटना नगला सेंदलाल या गावातील असून पीडितेचं एक घर गावाबाहेर आहे, याच घराच्या बाहेर आरोपींनी कागदावर त्यांची मागणी लिहिली आहे. आरोपींना लवकरचं अटक करण्यात येईल असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं आहे.
0 Comments