-->

Ads

अंबरनाथ औद्योगिक क्षेत्राचे अधिकारी आणि दलाल यांनी 250 एकर जमीन परस्पर विकली अंबरनाथ मधील पत्रकार सुनील आहिरे यांचा आरोप....

अंबरनाथ शहर ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या औद्योगिक वसाहत असलेल ठिकाण, तसेच शिलाहार राजांनी अकराव्या शतकात बांधलेले पुरातन हेमाडपंथी शैलीचे शिवमंदिर व आगपेट्यांचा व दारूगोळ्याचा कारखाना आणि अनेक रासायनिक उद्योगही आहेत. 

                                                       LIVE NEWS CLICK 


अंबरनाथ औद्योगिक क्षेत्रात एकूण 900 कंपन्या आहेत. त्यामुळे मुंबई पासून ठाणे रायगड या जिल्ह्यातुन नवं युवक नोकरी साठी अंबरनाथ गाठतात. जस जसा अंबरनाथ शहराचा विकास होत गेला तस तसा भ्रष्टाचार, गुन्हेगारीत सुद्धा झपाट्याने वाढत गेली. अंबरनाथ शहराला लागून बरीच गावे आहेत त्यांची गुरचण जागेवर काही ठिकाणी मोठ्या टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या तर चिखलोली गावाला लागून औद्योगिक वसाहत असल्याने चिखलोली गावची सर्व्हे क्रमांक 55, गुरचण जागा ही MIDC ने गावकऱ्याची आणि महाराष्ट्र महसूल खात्याची परवानगी न घेता परस्पर 13 उद्योगकाना विक्री केल्याचे आरटीआय कार्यकर्ते पत्रकार सुनील अहिरे यांनी गैरव्यवहार उघडकीस आणला आहे. तब्बल 250 एकर जमीनचा 350 करोड रूपाचा घोटाळा अधिकारी आणि दलाल यांनी मिळून केला असल्याचे अहिरे यांनी सांगितले. हा घोटाळा औद्योगिक विकास महामंडळचे कार्यकारी अधिकारी भूषण गगराणी आणि भूखंड वाटप समिती दलाल मिळून केल्याचे अहिरे यांनी सांगितले. तसेच सर्व्हे क्रमांक 55 वर तर व्यवसायिक यांनी कंपनीचे काम सुद्धा सुरू केल आहे. 






त्यामुळे गावकऱ्यांमध्ये असंतोष पाहायला मिळत आहे. या गैव्यवहरा संदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे सांगितले व अधिकाऱ्याची संपत्तीची आर्थिक गुन्हे शाखेच्या अंतर्गत चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

उस्मान शाह, अंबरनाथ


Post a Comment

0 Comments