एका विवाहित महिलेचं (married women) सातवीमध्ये शिकणाऱ्या 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलावर (minor boy) प्रेम जडलं. नवरा आणि तीन लहान मुलांना वाऱ्यावर सोडून ती फरार झाली आहे.
गोरखपूर, 15 मार्च : प्रेमात पडल्यावर माणूस आंधळा होतो असे म्हणतात... पण त्याचबरोबर काही वेळा तो विचार करण्याची शक्ती देखील गमावून बसतो. एका विवाहित महिलेबाबत (married women) तरी असंच म्हणता येईल. या महिलेचं सातवीमध्ये शिकणाऱ्या 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलावर (minor boy) प्रेम जडलं आणि ती फरार झाली. या प्रकरणात पोलिसांमध्ये तक्रार करण्यात आली असून आता पोलीस या फरार व्यक्तींचा शोध घेत आहेत.
तीन वर्षांपासून होते प्रेम
उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) गोरखपूर (Gorakhpur) मधील हे सर्व प्रकरण आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार तो मुलगा फक्त 13 वर्षांचा होता, तेंव्हाच या महिलेचं मुलावर प्रेम जडले. ते दोघं एकत्र फिरत असत, पण वयातील अंतरामुळे त्यांच्यामध्ये प्रेमसंबंध असतील असं कुणालाही वाटले नाही. आता गावातील काही मंडळींनी अल्पवयीन मुलगा महिले सोबत पळून गेला असल्याचे सांगितले आहे. त्या महिलेचा मोबाईल देखील सध्या बंद आहे. या महिलेला तीन लहान मुलं असून त्यांचं वय 7, 5 आणि 3 आहे.
महाशिवरात्रीच्या दिवशी त्यांच्या गावात मोठी जत्रा भरते. त्या जत्रेमध्ये महिला अल्पवयीन मुलाला घेऊन गेली त्यानंतर ते दोघं घरी परतले नाहीत. पत्नी घरी न परतल्यानं तिच्या पतीनं याबाबत पोलिसांमध्ये तक्रार केली. त्याचवेळी अल्पवयीन मुलाची आई देखील तिथे आली. त्यांच्या तक्रारीनंतर महिलेवर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.
अल्पवयीन मुलाच्या आईच्या तक्रारीनंतर महिलेवर इंडियन पीनल कोड 363 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यामध्ये फरार व्यक्तींचा शोध लवकरात लवकर घेण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. सध्या तरी संदिग्ध परिस्थितीमध्ये तीन मुलांची आई अल्पवयीन मुलासोबत फरार झाल्याची घटना गावामध्ये चर्चेचा विषय बनली आहे.
0 Comments