-->

Ads

सख्ख्या आईच्या संमतीने 15 वर्षांच्या मुलीवर गँगरेप, 32 जणांना अटक

 संबंधित महिला सुरुवातील पीडितेची मावशी असल्याचं सांगत होती. परंतु ती सख्खी आई असल्याचं समजल्यानंतर पोलिसही हैराण झाले. (Chikkamagaluru Gang Rape Mother Daughter)


कर्नाटकात सख्ख्या आईच्या संमतीने मुलीवर सामूहिक बलात्कार

बंगळुरु : 15 वर्षांच्या पोटच्या मुलीवर आईनेच सामूहिक बलात्कार घडवून आणल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. कर्नाटकातील चिक्कमंगळुरुमध्ये घडलेल्या या प्रकारामुळे समाजमन सुन्न झालं आहे. जवळपास 30 जणांनी पीडितेवर अत्याचार केल्याची भीती आहे. मुलीची मावशीच या प्रकरणात मुख्य आरोपी असल्याचं फेब्रुवारी महिन्यात समोर आलं होतं, परंतु आरोपी महिला पीडितेची सख्खी आई असल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली. (Karnataka Chikkamagaluru Gang Rape Mother allegedly encouraged assault of Daughter)

कर्नाटकातील श्रीनगेरी तालुक्यातील एका गावात राहणारी महिला वेश्या व्यवसाय चालवत होती. जानेवारी महिन्याच्या अखेरीस पोलिसांना या रॅकेटविषयी माहिती मिळाली होती. पोलिसांनी आतापर्यंत 32 जणांना अटक केली आहे. संबंधित महिला सुरुवातील पीडितेची मावशी असल्याचं सांगत होती. परंतु ती सख्खी आई असल्याचं समजल्यानंतर पोलिसही हैराण झाले.

Post a Comment

0 Comments