चालत्या कारमध्ये
केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Gang Rape Video) झाला. या व्हिडीओबद्दल जेव्हा जयपूर पोलिसांना माहिती मिळाली तेव्हा त्यांनी या गोष्टीचा तपास सुरू केला.
जयपूर 09 मार्च : चालत्या कारमध्ये एका महिलेवर बलात्कार केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Gang Rape Video) झाला. यानंतर या घटनेचं गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी पीडितेला जयपूरमध्ये (Jaipur Crime News) बोलावून घेत तक्रार दाखल करुन घेतली आणि तीन आरोपींना अटक केली. ही घटना 6 महिन्यांपूर्वीची असल्याचं सांगितलं जात असून वेगवेगळ्या तीन कारमध्ये महिलेवर लैंगिक अत्याचार तसंच मारहाण करण्यात आली.
उत्तर प्रदेशमध्ये चालत्या कारमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओबद्दल जेव्हा जयपूर पोलिसांना माहिती मिळाली तेव्हा त्यांनी या गोष्टीचा तपास सुरू केला. व्हिडीओमध्ये महिलेसोबत सामूहिक बलात्कार होत असल्याचं स्पष्ट झालं होतं. पोलिसांनी यातील आवाज जयपूरमधील लोकांसोबत मिळताजुळता वाटला. यानंतर पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेत सीएसटी तसंच शरहातील 4 जिल्ह्यांमधील पोलिसांना तपासासाठी आणि व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या लोकांची ओळख पटवण्यासाठी लावलं. यातील पीडिता ही उत्तर प्रदेशमधील असल्याचं स्पष्ट झालं, यानंतर पोलिसांनी महिलेला जयपूरमध्ये बोलावून मानसरोवर ठाण्यात तक्रार दाखल करुन घेतली.
पीडितेनं तक्रार दाखल करताना सांगितलं, की 19 ऑक्टोबर 2020 रोजी ती न्यू सांगानेर रोडजवळील साई कृपा हॉटेलमध्ये थांबली होती. यादरम्यान महिलाच्या ओळखीच्या संजू बंगाली नावाच्या व्यक्तीनं तिला पैशाचं आमिष देत एका मुलासोबत पाठवलं. या मुलानं महिलेला एका कारमध्ये बसवलं. यात आधीपासून इतर चारजण होते. कारमधील व्यक्तींनी महिलेचा मोबाईल काढून घेतला आणि महिंद्रा सेजकडे (Mahindra World City Jaipur) घेऊन जात तिच्यावर बलात्कार केला.
या घटनेदरम्यान कारमधील अन्य दोघांनी महिलेचा व्हिडीओ बनवला. दरम्यान अन्य 2 कारही तिथे आल्या आणि दुसऱ्या कारमध्ये घेऊन जात महिलेवर अत्याचार केला. घटनेत तब्बल 12 लोक सहभागी असल्याचा अंदाज आहे. पीडितेनं सांगितलं, की यात ती गुलाब आणि अभिषेक नावाच्या व्यक्तीला ओळखते. गुलाबनं पीडितेला धमकी दिली होती, की याबद्दल कोणालाही सांगितलं, तर तुझा व्हिडीओ व्हायरल करेल. याच कारणामुळे सहा महिने होऊन गेले तरीही पीडितेनं याप्रकरणाची तक्रार केली नाही.
या प्रकरणात चार डीसीपींसह सुमारे 10 आयपीएस आणि 40 सीआयची टीम तयार करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्त अजयपाल लांबाणे यांनी दिली. या पथकात पीडित आणि आरोपी युवकांचा सुमारे 100 पोलीस शोध घेत होते. रविवारी सकाळी पोलिसांना ही महिला उत्तर प्रदेशातील हरदोई येथील असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी महिलेशी संपर्क साधला आणि तिला जयपूरला बोलावले. रविवारी रात्री मानसरोवर ठाण्यात गुन्हा दाखल केला. यानंतर पोलिसांनी कारवाई करत लखनऊ, इंदौर आणि जयपूरच्या अनेक भागांमध्ये तपास करत अभिषेक, मोंटी आणि संजू बंगाली यांना ताब्यात घेतलं.
मिळालेल्या माहितीनुसार, ही गँग अश्लील व्हिडीओ बनवून ब्लॅकमेल (Blackmail) करण्याचं काम करते. या घटनेचं गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी पीडितेचं मेडिकल करत गुन्हा दाखल करुन घेतला. पोलीस सध्या इतर आरोपींचा शोध घेत आहेत.
0 Comments