'हॅलो, CMO मधून बोलतोय...'; सांगून पोलिसांना करायला सांगितलं धक्कादायक कृत्य; अखेर प्रकार झाला उघड
आतापर्यंत अनेक क्राइम व कट कारस्थान पाहिले असेल. मात्र हा प्रकार भयंकरच आहे. जेव्हा पोलिसांना नेमका प्रकार कळाला तेव्हा त्यांनी डोक्यावर हात मारुन घेतला.
रायबरेली, 11 फेब्रुवारी : गेल्या अनेक वर्षात गुन्हेगारीत तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढल्याचे पाहायला मिळते. सायबर क्राईमबरोबर आता एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका पठ्ठ्याने थेट मुख्यमंत्र्यांचा सल्लागार बनून (Adviser to CM) पोलीस अधीक्षक (SP) यांना धमकावणे आणि कट रचण्याचा प्रताप केला आहे. या प्रकरणात तीन जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
या आरोपींनी पोलीस अधिकाऱ्यांवर दबाव आणण्यासाठी VVIP सीरिजचा BSNL चा नंबर घेतला आणि त्यानंतर ट्रु-कॉलरवरील (Truecaller) नंबर मुख्यमंत्री सल्लागारांच्या नावाने फीड केला. जेणेकरुन अधिकाऱ्यांवर सहजपणे दबाव आणणं शक्य होईल आणि अनैतिक काम करवून घेता येऊ शकेल. पोलीस अधिकाऱ्यांनी मीडियाला दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी पोलीस व सर्विलान्स टीमने आरोपी सैय्यद नासिक उर्फ साहिल, प्रदीप शुक्ल, मोहम्मद शादाब या तिघांना अटक केलं आहे.
एसपींनी सांगितलं की, 22 जानेवारी रोजी त्यांच्या ऑफिसच्या लँडलाइनवर एक फोन आला होता. हा फोन मुख्यमंत्र्यांचा सल्लागार असल्याचं सांगत होता. त्या व्यक्तीने सांगितलं की, माझे परिचित डॉ. सलीम आपल्या बहिणीच्या प्रकरणात तुम्हाला भेटायला येणार आहे. त्यांच्या अर्जावर कठोर कारवाई करा. यानंतर डॉ. सलीम यांचे भाऊ हनीफ यांनी एसपी यांच्याकडे बहिणीच्या सासरच्यांची तक्रार केली. ते तिला मारहाण करीत असल्याचं त्याने सांगितलं. याशिवाय हुंड्यावर छळ करीत असल्याचंही सांगितलं. यावर कायदेशीर खटलाही दाखल झाला. दुसरीकडे बनावटी मुख्यमंत्र्यांच्या सल्लागाराने फोन करुन एसपींना सांगितलं की, खटल्यात 376 चे कलम वाढवा आणि तुरुंगात पाठवा. यानंतर एसपी यांना शंका आली. त्यांनी मुख्यमंत्री कार्यालयात फोन करुन यासंबंधात फोन केल्याची विचारणा केली,
काय आहे संपूर्ण प्रकरण?
यानंतर एसपींच्या पीआरओच्या तक्रारीनंतर पोलीस ठाण्यात खटला कायम ठेवण्यात आला. त्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार यापूर्वी पोलिसांनी डॉ. सलीम याला अटक करुन तुरुंगात पाठवलं होतं. गुरुवारी तीन संशयितांना अटक करण्यात आली होती. पोलिसांच्या चौकशीत सैय्यद नासिर याने सांगितलं की, मी सलीमच्या बहिणीचे सासरकडील लोकांना तुरुंगात पाठविण्यासाठी योजना तयार केली होती. त्याने आपल्या यापूर्वीचे ड्रायव्हर श्याम कुमार यांच्या कागदपत्रांवरील सीयूजी नंबरशी जवळ जाणारा नंबर घेतला. त्यानंतर ट्रु-कॉलरवर मुख्यमंत्र्यांचे सल्लागारांच्या नावाने सेव्ह केला. या कामासाठी त्याने डॉ. सलीम यांच्याकडून 30 हजार रुपये अॅडवान्स घेतले होते. पोलिसांनी या तीनही आरोपींना ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडून बीएमडब्यू कार, एक मर्सिडीज कार, एक एक्स्युवी कार आणि एक मोबाइल जप्त केला आहे.
0 Comments