-->

Ads

उद्योजक आनंद उनवणे यांचा खून करून मृतदेह सावित्री नदीच्या पात्रात फेकण्यात आला

 पिंपरी-चिंचवडच्या उद्योजकाचा रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यामध्ये खून, उद्योजक आनंद उनवणे यांचा खून करून मृतदेह सावित्री नदीच्या पात्रात फेकण्यात आला.महाड एमआयडीसी पोलिसांचा जलदगतीने तपास

महाड तालुक्यातील भोराव गावाजवळील सावित्री नदीपात्रात शनिवारी मृतदेह सापडला होता. हा मृतदेह सापडल्या नंतर आत्महत्या की हत्या असा प्रश्न पोलिसांसमोर आणि संपूर्ण जनतेसमोर निर्माण झाला होता. परंतु ही आत्महत्या नसून हत्या असल्याचे निष्पन्न झाले. 

,,, डोक्यावर व तोंडावर धारदार शस्त्राने वार व अंगावर कपडे नसल्याने मृताची ओळख पटवणे खूपच कठीण होते. हा मृत्यू देह पुण्यातील पिंपरी चिंचवड येथील उद्योजक आनंद उनवणे यांचा असून आनंद उनवणे चार दिवसांपासून बेपत्ता होते.

,,,,आनंद उनवणे यांची एफ एफ आय  चीत फंड नावाची कंपनी आहे त्यामुळे त्यांची ही हत्या व्यवसायिक वादामुळे की अन्य कुठल्या कारणामुळे  झाली असावी याचा तपास महाड एमआयडीसी पोलीस स्टेशन पोलीस अधिकारी करीत आहेत.




Post a Comment

0 Comments