-->

Ads

पोलीसांच्या सतर्कतेमुळे वाचला ६०वर्षीय वृध्द महिलेचा जीव

कल्याण नगर महामार्गावरील‌ रायते नदी पुलावरील घटना


टिटवाळा-: कल्याण नगर राष्ट्रीय महामार्गावरील‌ रायते गावाजवळ उल्हासनदीतच्या पुलावरून उडी मारून एक ६० वर्षी वृध्द महिला मंगळवारी  आत्महत्या करण्याच्या तयारीत असतांनाची घटना गोवेली कडून म्हारळच्या दिशेने गस्तीवर जाणाऱ्या टिटवाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजू वंजारी यांच्या निदर्शनास आली. तात्काळ गाडी थांबवत त्यांच्या सोबत असणारे पोलिस उपनिरीक्षक कमलाकर मुंढे, पोलिस कर्मचारी सोमनाथ भांगरे व चालक उत्तम घोडे यांनी सदर महिलेच्या दिनेश धावले. सदर महिलेला मुंढे व भांगरे यांनी पकडून पुलाचे रेलिंग मधून व्यवस्थित बाहेर काढत आपल्या गाडीतून पोलिस ठाण्यात आणले. सदर वृध्द महिला ही कल्याण येथील गुरूनानक शाळेजवळी सदानंद काॅलनी येथील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले. घरगुती कलह, मुलगा व्यवस्थित देखभाल करत  नाही तसेच आजारपण याला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे वृध्द महिलेने पोलिसांना सांगितले. सदर महिलेला पोलीसांनी म्हस्कल येथील निराधार महिलांच्या संवर्धन फाउंडेशन येथे दाखल केले असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू वंजारी यांनी दिली.

Post a Comment

0 Comments