युथ ऑफ टुडे वेल्फेअर फाउंडेशन बदलापुर व अम्मुकेअर चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत राबवण्यात येणाऱ्या रिवर क्लीन अप मिशन 2021(River Cleanup Mission 2021) या उपक्रमा अंतर्गत उल्हास नदी बदलापूर हा नदीचा परिसर स्वच्छ करण्यात आला, गेल्या दोन वर्षांपूर्वी चालू झालेला आपल्या रिवर क्लीन मिशन मार्फत प्रत्येक रविवारी संस्थेमार्फत नदीच्या पात्राची व परिसराची स्वच्छता करण्यात येत होती,गेल्या काही महिन्यांपासुन हा उपक्रमास कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे काही काळापर्यंत बंद करण्यात आला होते, परंतु आता या उपक्रमाला नव्याने मोठ्या जोशात सुरुवात करण्यात आली आहे.नवीन वर्षात नवीन सकारात्मक कार्य सोबत नवीन जोशात या महिन्याच्या दुसऱ्या रविवार पासून आपण हे रिव्हर क्लीन अप मिशन बदलापूर परिसरात उल्हास नदी इथे राबवण्यात आले आहे.
10 जानेवारी 2021रोजी जानेवारी महिन्याच्या दुसरा रविवार पासून हा उपक्रम बदलापूर येथील उल्हास नदी या परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली नदीच्या पात्राची व जवळपासच्या परिसराची स्वच्छता संस्थेमार्फत करण्यात आली..संस्थेमार्फत विविध समाजपरिवर्तनाचे उपक्रम राबवले जात असता तर ह्या वेळेस संस्थेच्या या रिवर क्लिप मिशनला बदलापूर पश्चिम येथील भारत कॉलेजचे N.S.S Unit che 30 हुन जास्त विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला.तसेच सत्कर्म बालकाश्रमाला येथील बालकांनी देखील या उपक्रमात मोठ्या उत्साहाने सहभाग घेऊन या लहान वयापासूनच पर्यावरणाची निगा कशी राखावी याचे धडे संस्थेकडून घेतले.आपल्या स्वच्छता मिशन ची दखल कुळगाव बदलापूर नगरपरिषद चे स्वच्छता
विभागाने देखील घेतले स्वच्छता विभागाचे निरीक्षक आशिष दिलीप जाधव सर सह पंढरी सर देखील या उपक्रमाला उपस्थित झाले व त्यांनी आपल्या बदलापूर परिसरात होणाऱ्या उल्हास नदीच्या स्वच्छते उपक्रमास संस्थेचे मन भरून कौतुक केले.युथ ऑफ टुडे वेलफेअर फाउंडेशन मार्फत विविध उपक्रम युवा विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्याकरिता राबवले जात असतात,विद्यार्थ्यांना प्रोत्साहित होऊन असे उत्कृष्ट उपक्रम समाजासाठी, परिसरासाठी करावे यासाठी त्यांना सन्मानपत्र देऊन त्यांचे सन्मान करण्यात आला.या उपक्रमाला उपस्थित असणाऱ्या भारत कॉलेज बदलापूर पश्चिम च्या N.S.S Unit च्या विद्यार्थ्यांना रिव्हर वॉरियर(River warrior💪)हे सन्मानपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला, आजच्या उपक्रमाला उपस्थित असणारे युथ ऑफ टुडे वेल्फेअर फाऊंडेशनचे युवा अध्यक्ष मार्शल सर च्या हस्ते व कुळगाव बदलापूर नगरपरिषद चे स्वच्छता निरीक्षक आशिष दिलीप जाधव सर सह पंढरी सरांना मार्फत ह्या विद्यार्थ्यांना व सत्कर्म बालक आश्रमातील बालकांना सन्मानपत्र देऊन त्यांचा सन्मान सत्कर्मा कला आणि क्रीडा केंद्र या ठिकाणी करण्यात आला.कुळगाव बदलापूर नगरपरिषद मार्फत सतत स्वच्छता मोहीम व स्वच्छता सर्वेक्षण 2021 मार्फत विविध उपक्रम व मोहीम राबवल्या जातात या उपक्रमाला युथ ऑफ टुडे वेलफेयर फाउंडेशन व अम्मुकेअर चॅरिटेबल ट्रस्ट चे स्वयंसेवकांना या उपक्रमात काम करण्याची संधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन अशीष जाधव सरांनी आपल्या वक्तृत्वातून सर्वांना दिले.आपण या समाजाचे घटक आहोत व समाज व परिसरात स्वच्छ ठेवणे हे आपलं जबाबदारी व कर्तव्य आहे त्याची अंमलबजावणी करण्याचा उपक्रम आज रिवर क्लीन अप मार्फत राबवण्यात आले.आजच्या या उपक्रमाला ४० हुन जास्त युवा विद्यार्थी व संस्थेचे कार्यकर्त्यांमार्फत उल्हास नदी बदलापूर पश्चिम स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.या उपक्रमात कुळगाव बदलापूर नगरपरिषद चे स्वच्छता कर्मचारी व अधिकारी देखील जोडले गेले,सत्कर्म बालकाश्रम चे सचिव मकरंद वाडेकर सरांचे संस्थेमार्फत खुप खुप आभार खूप कमी वेळात त्यांनी आम्हाला या उपक्रमासाठी सत्कर्मा कला व क्रीडा केंद्र ही जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार.बदलापूर शहर स्वच्छ ठेवण्याच्या प्रत्येक उपक्रमात नगरपालिके सोबत विविध उपक्रम राबविण्यात येतील अशा स्फूर्तीदायक उपक्रमाला सहकार्य करा व जास्तीत जास्त संख्येने स्वच्छता मोहीम रिवर क्लीनिंग मशीन 2021 मध्ये सहभागी व्हा,
हा उपक्रम प्रत्येक रविवारी उल्हास नदी बदलापूर पश्चिम या विभागात सकाळी साडेसात(7.30am) ते साडेनऊवाजे(9.30am) पर्यंत राबवण्यात येणार आहे.
आशा करतो की तुम्ही मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी व्हा व आपल्या बदलापूरची नदी मायला स्वच्छ करून तिला सुरक्षित बनवण्यास सहकार्य कराल. या उपक्रमाला उपस्थित असणारे युथ ऑफ टुडे वेल्फेअर फाऊंडेशनचे अध्यक्ष मार्शल नाडर सह संस्थेचे कार्यकर्ते कोमल भागवत,रतुल भूनिया व संस्थेचे इतर स्वयंसेवक देखील उपस्थित होते तसेच भारत कॉलेज बदलापूर पश्चिम या कॉलेजचे 30 हुन जास्त N.S.S Unit चे विद्यार्थी या उपक्रमाला उपस्थित होते आणि सत्कर्म बालकाश्रम मधील सहा(६) लहान बालक देखील ह्या स्वच्छता उपक्रमाला मोठ्या जोशाने उपस्थित राहिले या सर्वांचे यूथ ऑफ टुडे वेलफेयर फाउंडेशन व अम्मुकेअर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यामार्फत खूप खूप धन्यवाद.
0 Comments