अंबरनाथच्या तहसीलदारांना भेट घेऊन शिष्टमंडळाने दिले निवेदन
उस्मान शाह, अंबरनाथ
सन 2014 नंतर भाजपा सरकार सत्तेत आल्यापासून सातत्याने पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ होत गेलेली आहे. आजरोजी पेट्रोल व डिझेलने उच्चांक गाठला असून आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलचे भाव निम्म्या दरावर आलेले असताना सत्ताधारी केंद्रातील मोदी सरकार पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ करीत आहेत. यामुळे राज्यातील जनतेचे कंबरडे मोडून निघालेले आहे. मोदी सरकारच्या काळात झालेल्या पेट्रोल आणि डिझेल दरवाढी विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आज सर्वत्र आंदोलन करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने आज अंबरनाथमध्ये ही आंदोलन करत अंबरनाथच्या तहसीलदारांची शिष्टमंडळाने भेट घेऊन लेखी निवेदन दिले. हे आंदोलन युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या आदेशाने व अंबरनाथ शहराध्यक्ष सदाशिव पाटील, युवक जिल्हाध्यक्ष सचिन पाटील, माजी नगरसेवक कबीर गायकवाड, सरचिटणीस धनंजय सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली युवक शहराध्यक्ष प्रमोद बोराडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
या आंदोलनात युवक जिल्हाध्यक्ष सचिन पाटील, माजी नगरसेवक कबीर गायकवाड, सरचिटणीस धनंजय सुर्वे, कमलाकर सूर्यवंशी, युवक अध्यक्ष प्रमोद बोराडे, कृष्णा रसाळ पाटील, स्नेहल कांबळे, गणेश गायकवाड, रमेश बाजरी, संजय बन्सल, रोहित सिंग, विशाल जाधव, अन्वर सय्यद, सलमान सिंग, साबीरा सलमान, रवी शिंदे, कृष्णा वामसी, प्रशांत गायकवाड, इम्रान खान यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments