एलियनचं अस्तित्त्व आणि परग्रहावरील जीवनाच्या गोष्टी आपण खूप ऐकतो. मात्र रहस्यमय आवर्ती रेडिओ तरंगांमुळं मागील एका दशकामध्ये परग्रहावरील जीवनाच्या कथेवर विश्वास ठेवावसा वाटतो. या रेडिओ तरंगांनी खगोल शास्त्रज्ञांनाही विचारात पाडलंय. एका नव्या शोधानुसार हे संकेत नवी वैश्विकघटना असू शकते किंवा प्रत्यक्षात एलियनकडून आपल्याशी संपर्क करण्याचं साधन...
लंडन: एलियनचं अस्तित्त्व आणि परग्रहावरील जीवनाच्या गोष्टी आपण खूप ऐकतो. मात्र रहस्यमय आवर्ती रेडिओ तरंगांमुळं मागील एका दशकामध्ये परग्रहावरील जीवनाच्या कथेवर विश्वास ठेवावसा वाटतो. या रेडिओ तरंगांनी खगोल शास्त्रज्ञांनाही विचारात पाडलंय. एका नव्या शोधानुसार हे संकेत नवी वैश्विक घटना असू शकते किंवा प्रत्यक्षात एलियनकडून आपल्याशी संपर्क करण्याचं साधन...
हा शोध जर्मनीच्या न्यूकिरचन-ल्यूइनमध्ये डेटा विश्लेषण संस्थेच्या संशोधकांनी लावलाय. या शोधात सांगण्यात आलंय की, हे संकेत २००७पासून मिळणं सुरू झालं होतं आणि आतापर्यंत असे ११ संकेत मिळाले आहेत. २०११मध्ये आतापर्यंतच्या अखेरच्या संकेताची माहिती मिळाली होती. या शोधात विशेष करून संकेत जास्त आणि कमी होण्यादरम्यानच्या वेळेवर लक्ष दिलं गेलं.
वृत्तपत्र हफिंग्टन पोस्टनं संशोधनाचे सहलेखक मायकल हिप्के यांच्याद्वारे सांगितलं की, हे संकेत अधिनव तारेच्या स्फोटासारख्या काही तत्त्वांद्वारे उत्पन्न झालेत. सर्व नक्षत्र (नोवा) एकाचवेळी फ्रिक्वेन्सी सोडते आणि धुळीमुळं ती पसरते. मात्र एक अडचण म्हणजे हे संकेत कृत्रिम वाटतात.
0 Comments