-->

Ads

Ambarnath News | शिवगंगानगर येथील दोन रस्त्यांचे डांबरीकरण

                     सुजाता भोईर यांच्या प्रयत्नांना यश





अंबरनाथ पूर्वेकडील शिवगंगा नगर रिक्षा स्टँड जवळचा रस्ता अनेक वर्षे बनविण्यात आला नव्हता, 6 वर्षांपासून या रस्त्यात एवढे खड्डे पडलेले होते, यामुळे दोन चार अपघात झाले आहे, येथून ये जा करणाऱ्या जेष्ठ नागरिकांनी भाजप महिला शहराध्यक्षा सुजाता भोईर यांच्या जनसंपर्क कार्यालयात येऊन तक्रार केली, 



तेंव्हा त्यांनी 6 जानेवारीला अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्यधिकारी प्रशांत रसाळ यांना पत्र देऊन सदर रास्ता बनवण्याची मागणी केली, त्यांनी त्यांच्या पत्राची दखल घेतली आणि 11 जानेवारी रोजी येथील दोन्ही रस्त्यांचे डांबरीकरण करून गणेशमूर्ती रस्ता आणि रिक्षा स्टँड मेन रस्ता बनवून दिला. यावेळी येथील नागरिकांनी सुजाता भोईर यांचे आभार मानले.

उस्मान शाह, अंबरनाथ

Post a Comment

0 Comments