-->

Ads

धोनीच्या रनआऊटने भारताचं वर्ल्ड कपचं स्वप्न भंगलं होतं, ICC ने शेअर केला व्हिडीओ

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील हा सामना गेल्यावर्षी 9 जुलै रोजी खेळवला गेला होता. मात्र पावसामुळे सतत व्यत्यय आल्याने सामना 10 जुलैला रिझर्व्ह डेला खेळवला गेला होता. मॅन्चेस्टरच्या ओल्ड ट्रेफर्ड मैदानावर हा सामना पार पडला.


नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट फॅन्स आजचा दिवस कदाचित कधीच विसरणार नाहीत. गेल्यावर्षी आजच्याच दिवशी भारतीय क्रिकट फॅन्सची मोठी निराशा झाली होती. कोट्यवधी भारतीयांचं वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न महेंद्रसिंह धोनीच्या एका रनआऊटमुळे भंगलं होतं. न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात भारताचा पराभव झाला होता.

गेल्यावर्षी 9 जुलै रोजी हा सामना खेळवला गेला होता. मात्र पावसामुळे सतत व्यत्यय आल्याने सामना 10 जुलैला रिझर्व्ह डेला खेळवला गेला होता. मॅन्चेस्टरच्या ओल्ड ट्रेफर्ड मैदानावर हा सामना झाला. न्यूझीलंडने टॉस जिंकून प्रथम बॅटिंगचा निर्णय घेतला होता. पहिल्यांदा बॅटिंगला आलेल्या न्यूझीलंडने 50 ओव्हरमध्ये 239 धावा केल्या. यानंतर 240 धावांचा पाठलाग करायला आलेली टीम इंडिया 49.3 ओव्हरमध्ये 221 धावांवर ऑल आऊट झाली. या सामन्यात न्यूझीलंडने भारताचा 16 धावांनी पराभव केला होता.

Post a Comment

0 Comments