बारामती, 8 जुलै: फेसबुक बनावट अकाऊंट उघडून महिलांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठऊन प्रोफाईल फोटो मॉर्फ करून अश्लिल फोटो तयार करणाऱ्या भामट्याचा नांग्या पोलिसांनी आवळल्या आहेत. बारामती पोलिसांनी आरोपीला रंगेहात पकडले आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि 353 (c),आयटी अॅक्ट 67,67a प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.संदीप सुखदेव हजारे (वय-29, वर्षे, रा. आंबवडे, ता. खटाव, जि. सातारा) असं आरोपीचं नाव आहे. बारामती पोलिसांनी आरोपीला दहिवडी येथून अटक केली आहे. आरोपीने आपला गुन्हा कबूल केला आहे. आरोपी संदीप हजारे हा गणेश खरात या बनावट नावानं फेसबुक अकाऊंट चालवत होता.याच अकाऊंटवरून तो शेकडो महिलांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत होता.
महिलांनी फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर महिलांचे प्रोफाईल फोटो क्रॉप करून त्यांचा चेहरा वापरून महिलांचे अशील फोटो तयार करत होता. नंतर संबंधित महिलांना चॅट करून 'माझ्याशी बोल. मैत्री कर. नाहीतर तुझे अश्लिल फोटो व्हायरल करेल.', अशी धमकी देत होता.
बारामती तालुका पोलिस स्टेशनमध्ये याबाबत काही महिलांनी तक्रार दिली होती. पोलिस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सपोनि योगेश लंगुटे, पोलिस नाईक परिमल मानेर, पोलिस कॉन्स्टेबल नंदू जाधव, पोलिस कॉन्स्टेबल मंगेश कांबळे, पोलिस कॉन्स्टेबल विनोद लोखंडे यांनी तांत्रिक टीमच्या मदतीनं आरोपी संदीप सुखदेव हजारे याला दहिवडी येथे रंगेहात अटक केली.
0 Comments