-->

Ads

ढाणकीत एकूण सहा रिपोर्ट पॉसिटीव्ह

नागरिकांनी काळजी घेण्याची गरज

कोरोनाचा वाढता प्रभाव आता वाढत असून ढाणकी शहरात आता नव्याने पाच रिपोर्ट पॉसिटीव्ह आल्याने नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे.


ढाणकी  ( प्रतिनिधी संजय जाधव )
तीन दिवसापूर्वी गावातील एका प्रतिष्ठित व्यक्ती चा रिपोर्ट पॉसिटीव्ह आल्या नंतर प्रशासन खडबडून जागे झाले होते व खबरदारी म्हणून  रुग्ण ज्या गल्लीत राहत होता तो इलाका सील करण्यात आला आहे.  रुग्ण ज्या व्यक्तींच्या संपर्कात आला होता त्या व्यक्तींना मरसूल येथील कोविड सेंटर मध्ये एकूण 96 लोकांना  कोरंटाईन करण्यात आले होते. त्यापैकी 66 व्यक्तींचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले होते.  राहिलेल्या व्यक्तीनं मधून आज  पाच व्यक्तीचे रिपोर्ट पॉसिटीव्ह आल्याने नागरिकात एकच खळबळ माजली असून सर्वांचा चिंतेचा विषय बनला आहे.  नागरिकांच्या वतीने खबरदारी म्हणून 10 दिवसाचा जनता करफ्यु चे आवाहन केले असून त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

मरसूळ येथून गृह विलगीकरणासाठी घरी सोडण्यात आलेले व्यक्ती घरी च न राहता गावात इतरत्र फिरत असल्याने गावात चिंतेचे वातावरण असून प्रशासनाने या व्यक्तींना आवरणे गरजेचे आहे.

नाहीतर पॉसिटीव्ह रुग्णाचा आकडा वाढण्यास वेळ लागणार नाही.  तरी नागरिकांनी विनाकारण बाहेर फिरू नये,  व आपली काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासना कडून करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments