कोरोनाचे सावट आता सामान्यांपासून बॉलिवूडही आलेले दिसत आहेत.
बई, 12 जुलै : कोरोनाचे सावट आता सामान्यांपासून बॉलिवूडही आलेले दिसत आहेत. शनिवारी अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर चाहते चिंतेत असताना आता ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांच्या घरातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. अनुमप खेर यांच्या आई कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. त्यांना कोकीलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अनुपम खेर यांनी ट्वीट करत याबाबत माहिती दिली. अनुपम खेर यांचा भाऊ, वहिनी आणि पुतणी यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान अनुपम खेर यांचीही कोरोना चाचणी करण्यात आली, मात्र त्याचे रिपोर्ट निगेटिव्ह असल्याची माहितीही त्यांनी दिली.
शनिवारी बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना कोरोनाची लागण (Covid-19) झाल्याची बातमी समोर आलेली असतानाच आता त्यांचा मुलगा आणि अभिनेता अभिषेकसुद्धा COVID पॉझिटिव्ह असल्याचं निदान झालं आहे
0 Comments