-->

Ads

फुलसावंगी नाली खोदल्यामुळे ग्रामस्थांनाचे आरोग्य धोक्यात

 फुलसावंगी ग्रामपंचायतचा मनमानी कारभार 




उमरखेड प्रतिनिधी संजय जाधव 

स्थानिक वार्ड क्रमांक सहा मधील तत्कालीन म्हणजे दहा वर्षांपूर्वी ग्रामपंचायतनेच ग्रामस्थांनच्या आरोग्यचा विचार करून ही नाली कायमस्वरूपी बंद केली होती परंतु आता ग्रामपंचायत च्या त्याच वार्डातील रहिवाशी असलेल्या सदस्याच्या सांगण्यावरून ग्रामपंचायत प्रशासनाने ती नाली खोदुन ठेवली त्यामुळे सांडपाणी संपूर्ण रस्त्यावरच जमा होत आहे पावसाच्या पाण्यासोबत ते नालीचे घाण पाणी स्थानिक रहिवाशाच्या घरादारात शिरत आहे त्यामुळे स्थानिक रहिवाशांना नाहक दुर्गंधी चा त्रास सहन करावा लागत आहे,       


       
             फुलसावंगी ग्रामपंचायत ला या संदर्भात वारंवार तोंडी व लेखी तक्रार देऊन कुठलीही दखल घेतली जात नाही सर्व काही त्या सदस्याच्या सांगण्यावरूनच  ग्रामपंचायत काम करीत आहे
जी नाली दहा वर्षापूर्वी तत्कालीन ग्रामप प्रशासनाने नागरिकांचे आरोग्याचा विचार करून कायमस्वरूपी बंद केली होती ती नाली आता ऐन पावसाळ्यात खोदण्यात ग्रामपंचायत ला कोणती गोडी आहे? की येणाऱ्या काही दिवसात प्रशासनाचा कार्यकाळ संपत असल्यामूळे जमेल त्या कामातून हे प्रशासन माया जमविण्याच्या फंदात आहे काय?  असे असेल तर जे दलित वस्ती सुधारणे च्या नावावर आलेले जवळपास तीन कोटी रुपयांचा निधीचा असाच दुरुपयोग झाला नसेल ते कशावरून? हे नाली ताबडतोब बुजवून टाका? किंवा दुसऱ्या मार्गाने नालीचे पक्के बांधकाम करून ग्रामस्थांनची ही जीवघेणी समस्या कायम ची निकाली काढावी या करिता वार्ड क्रमांक सहा मधील काही रहिवाशांनी आज ग्रामपंचायत समोर मोर्चा नेला होता यामध्ये माधव घोडे, बळवंत शिंदे, बुध्दाजी विणकरे , शेख अनिस, रुख्मिनाबाई वीणकरे ,मधुकर घोडे, सुलोचना घोडे व शेकडो महिला उपस्थित होत्या

Post a Comment

0 Comments