-->

Ads

कोरोनाबाबत मोठी बातमी! आता लक्षणविरहीत नागरिकांचीही होणार टेस्ट- आरोग्य मंत्री

कोरोनाबाबत मोठी बातमी! आता लक्षणविरहीत नागरिकांचीही होणार टेस्ट- आरोग्य मंत्री


मुंबई, 8 जुलै: राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्यानं प्रशासनही हादरलं आहे. नागरिकांमध्ये कोरोनाचा मोठी दहशत निर्माण झाली आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.
राज्यात आता कोरोना लक्षणविरहीत नागरिकांचीही टेस्ट केली जाणार आहे, अशा माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यातील नागरिकांच्या जास्तीत जास्त टेस्ट कराव्यात, अशा सूचना केंद्र सरकारनं दिल्या आहे. त्यामुळे आता प्रिस्क्रीपशन शिवाय देखील कोरोना टेस्ट केल्या जाणार आहेत, असंही आरोग्य मंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.दुसरीकडे, मास्कचा काळाबाजार करू नये. मास्क किंमत सर्वत्र स्थिर असावी. यासाठी सरकार लवकरच भूमिका घेणार असल्याचंही राजेश टोपे यांनी यावेळी सांगितलं.
गोलेबल हॉस्पिटल गायकवाड प्रकरणाचा तपास पोलिस करत आहे. त्याचा रिपोर्ट आल्यानंतर दोषींवर कारवाई केली जाईल. कोणाचीही गय केली जाणार नाही, असा इशारा राजेश टोपे यांनी दिला आहे.
दरम्यान, राज्यात गेल्या 24 तासांत 5134 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 217181 एवढी झाली आहे. तर 3296 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 118558 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 89313 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दरम्यान, राज्यात मागील 24 तासांत 224 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आतापर्यंत राज्यात एकूण 9250 रुग्णांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात मागील 24 तासांत तब्बल 482 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात 22752 नवे रुग्ण सापडले आहेत. भारतात आतापर्यंत एकूण 742 417 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. भारतात आतापर्यंत एकूण 20 हजारांहून जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Post a Comment

0 Comments