17 मार्चलाच तो पॅरोलवर सुटला होता. त्याच्याकडे 22 लाखांची विदेशी बनावटीची पिस्तुल आली कुठून याची माहिती पोलीस घेत आहे.
नवी दिल्ली 12 जुलै: दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रांचला रविवारी मोठं यश मिळालं. दाऊद इब्राहिम टोळीतला गुंड आणि गँगस्टर असेलल्या अन्वर ठाकूर याला पोलिसांनी अखेर अटक केलीय. अने गंभीर गुन्हे नावावर असलेला अन्वर हा जेलमध्ये होता. जेलमधून तो पॅरोलवर बाहेर आला होता. त्यानंतर त्याने पुन्हा एकदा गुन्हेगारीला सुरुवात केली होती. त्यामुळे पोलीस त्याला पकडण्यासाठी प्रयत्न करत होते. अखेर तो पोलिसांच्या तावडीत सापडला आहे. त्याच्याकडून ब्राझिल बनावटीचं 22 लाखांचं पिस्तुल पोलिसांनी जप्त केलं आहे. ‘आज तक’ने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
अन्वरवर पोलिसांच्या खबऱ्याचा खून केल्याचाही आरोप आहे. या प्रकरणी त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. अन्वर हा एका गँगला पुन्हा उभे करण्याच्या प्रयत्नात होता. त्या गँगचा म्होरक्या जेलमध्ये गेल्यानंतर त्याच्या टोळीतली माणसं नव्या गड्याच्या शोधात होती. त्या सगळ्यांना अन्वरने आपल्या जाळ्यात ओढलं आणि तो नवीन टोळी तयार करण्याचा प्रयत्न करत होता.
अन्वर हा दिल्लीतल्या मयुर विहार फेज-1 मध्ये राहात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. त्याचा मोठा भाऊ सुद्धा गुन्हागार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 17 मार्चलाच तो पॅरोलवर सुटला होता. त्याच्याकडे 22 लाखांची विदेशी बनावटीची पिस्तुल आली कुठून याची माहिती पोलीस घेत आहे.
गुंडांना शस्त्र पुरविणारी टोळी कार्यरत आहे का याचाही तपास पोलीस करत आहेत. अन्वरचा दाऊदची नेमका काय संबंध होता आणि त्याचे आणखी काय कारनामे आहेत याचाही पोलीस तपास करत आहेत.
0 Comments