कल्याण-डोंबिवली आणखी 2 कोरोनाबाधित रुग्ण, लग्न सोहळ्यात एकाला झाली लागण
डोंबिवलीमध्ये आढळलेला रुग्ण एका लग्न सोहळ्यात गेला होता. तिथे त्याला कोरोना विषाणूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.
कल्याण, 28 मार्च: राज्यातल्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. हा आकडा आता 169 वर पोहोचला आहे. त्यात कल्याण (पूर्व) आणि डोंबिवलीत प्रत्येकी एक असे दोन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. डोंबिवलीमध्ये आढळलेला रुग्ण एका लग्न सोहळ्यात गेला होता. तिथे त्याला कोरोना विषाणूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा..डोंबिवलीकर तरुणाचा कहर, हळदी अन् लग्नात झाला हजर, मित्रांना मेसेज करून सांगितलं मला कोरोना...
याबाबत मिळालेली माहिती अशी की, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात दोन कोरोनाबाधित नवीन रूग्ण आढळून आले आहे. आतापर्यंत महापालिका क्षेत्रातील रूग्णसंख्या 8 झाली आहे. नवीन रूग्ण हे चिंचपाडा, कल्याण पूर्व व राजाजी पथ, डोंविबली पूर्व येथील आहेत. सदर दोन्ही रूग्णांच्या परिसरात महापालिकेच्या तिसगाव व मढवी नागरी आरोग्य केंद्रामार्फत सर्व्हेक्षण कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. शासनाच्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे कंटेन्टमेंट प्लॅन तयार करण्यात येऊन सदर कार्यवाही पुढील 14 दिवस घरोघरी जाऊन राबविण्यात येणार आहे.
LIVE UPDATE AMBARNATH
LIVE UPDATE AMBARNATH
0 Comments