-->

Ads

मुंबईत कॅफेमध्ये सुरू होता सेक्स रॅकेटचा व्यवहार, टीव्ही अभिनेत्रीसह 4 ताब्यात, अल्पवयीन मुलीची सुटका





मुंबई, 24 जानेवारी : मुंबईत पुन्हा एकदा पोलिसांनी  छापा टाकून एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.   पोलिसांच्या समाजसेवा शाखेने कांदिवलीतील स्टारबक्स कॅफेमध्ये धाड टाकून बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रींसह 4 तरुणीची सुटका केली. धक्कादायक म्हणजे, यात एका अल्पवयीन मुलीचा देखील समावेश आहे.
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून समाजसेवा शाखेनं ठिकठिकाणी धाडी टाकून सेक्स रॅकेट आणि व्यवहारांचा डाव हाणून पाडला आहे. 23 जानेवारीला संध्याकाळी 5 वाजेच्या सुमारास कांदिवली परिसरातील स्टारबक्स कॅफेमध्ये सेक्स रॅकेटसाठी व्यवहार होत असल्याची पोलिसांना खबऱ्याकडून माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे समाजसेवा शाखेनं धाड टाकली. या धाडीत पोलिसांनी बॉलिवूड आणि टीव्ही मालिकेत काम करणाऱ्या अभिनेत्रींसह चार तरुणींची सुटका केली. तर एका पुरुषासह दोन महिलांना देखील अटक केली आहे.
याआधीही मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने  एक हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट उघडकीस आणलं होतं. पोलिसांनी मुंबईतील अंधेरी पूर्व येथील ड्रॅगन फ्लाय या थ्री स्टार हॉटेलवर धाड टाकून तीन मुलींची सुटका केली. यामध्ये एक हिंदी अभिनेत्री, एक मराठी अभिनेत्री आणि एक अल्पवयीन मुलगी यांची सुटका करण्यात आली.
पिंपरी-चिंचवडमध्ये SEX रॅकेटचा पर्दाफाश
दरम्यान, पिंपरी चिंचवड परिसरात  स्पा मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. पोलिसांनी हे सेक्स रॅकेट उद्धवस्त केलं असून यामध्ये सामील असलेल्या सहा तरुणींची सुटका करण्यात आली आहे.
पिंपरी शहरातील उच्चभ्रू वस्तीत असलेल्या स्पाईन सीटी मॉलमधील दुकान नंबर 3 व 4 मध्ये सिटी स्पा मसाज सेंटर" या नावाने पार्लर सुरू असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक दीपाली मरळे यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून आपल्या सहकाऱ्यांमार्फत छापा मारला. यामध्ये स्पा चालविणाऱ्या आणि तिथे आढळून आलेल्या राजेश कानुरे, शिवा कोळपे, रितेश घाटकर आणि विक्रम पलांडे ह्या चौघांविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
सेक्स रॅकेटमध्ये अटक करण्यात आलेल्या चौघांवरही मसाज सेंटरमधील तरुणींना वैश्या-व्यवसाय करण्यासाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसंच तरुणींनी देहविक्री केल्यानंतर मिळणारी रक्कम चारही आरोपी हे स्वतःची उपजीविका भागविण्यासाठी वापरत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Post a Comment

0 Comments