-->

Ads

पाळी आल्यावर सुट्टी टाकली की कापला जायचा पगार, 24 वर्षांच्या तरुणीने कंटाळून काढलं गर्भाशय

पाळी आल्यावर सुट्टी टाकली की कापला जायचा पगार, 24 वर्षांच्या तरुणीने कंटाळून काढलं गर्भाशय




बीड, 28 जानेवारी : चौदा वर्षांच्या जनाबाईला सफेद घोड्यावर येणाऱ्या राजकुमाराची स्वप्न बघण्याचा वेळच नाही मिळाला. एक दिवस कामावरून परत आल्यानंतर लग्नाची बोलणी सुरू असल्याचं ऐकलं. वर्षभरातच, ती तिच्या मांडीवर एका महिन्याच्या बाळासह ऊस तोडण्यासाठी गेली. घरं म्हणजे लाकडाचं आणि चटईचं छप्पर. 14-15 तास काम. रोज हात रक्ताने माखायचे. उसाची मोळी उचलून कंबर आणि मानेमध्ये वेदना. इतक्यात 'पीरियड्स' आले. रजा घेतली तर घरी ठेकेदार आला. शिवीगाळ केली. एकटी असल्याचं पाहून त्याने विनयभंग केला आणि निघून गेला. बरं त्याने सुट्टीचे पैसे कापले ते वेगळंच.
वयाच्या 23 व्या वर्षी जनाबाईची शस्त्रक्रिया झाली. ती सांगते- गर्भाशय काढून टाकल्यामुळे आता कंबरेमध्ये वेदना आहेत. ताप येतो. ऊस तोडीचं काम सुटलं आणि नवरासुद्धा.
'एक गोष्ट चांगली आठवते ती म्हणजे, प्रतीक्षा (वाट पाहणे). शेतकरी घरातला जन्म. आई-वडिलांकडे जमिनीचा एक लहानसा तुकडा होता परंतु ते इतरांच्या शेतात काम करायचे. ज्यांची शेती होती त्यांच्याकडे बोअरवेल होती. आमची जमीन कोरडी पडून आमची वाट पहात राहिली. जेव्हा मी मोठी झाले तेव्हा इतर मुलांप्रमाणे मी शेतात काम करण्यास सुरुवात केली. एक दिवस काम करत असताना माझ्या लग्नाची चर्चा सुरू असल्याचं कानावर आलं. तेव्हा मी अंदाजे 14-15 वर्षे वयोगटातील असावी' असं जनाबाई म्हणतात.

Post a Comment

0 Comments