-->

Ads

पशुवैद्यकीय रुग्णालयाचे हदगाव मध्ये बेहाल

पशुवैद्यकीय रुग्णालयात पायाभूत सुविधेचा अभाव

हदगांव:-  मानवी जीवा प्रमाणेच जीव असणाऱ्या व मानवाप्रमाणे तब्येत बिघडत असणाऱ्या मुख्य जनावरांसाठी शासनाकडून करोडो रुपये खर्च होत असतानासुद्धा हदगाव मध्ये मात्र मुख्य जनावरांच्या उपचारासाठी असलेल्या पशुवैद्यकीय रुग्णालयात पायाभूत सुविधेचा अभाव असून जनावरांना पण जीवंतपणी नरक यातना भोगाव्या लागत असल्याचे दिसून येत आहे हादगाव शहरात मुख्या जनावरांना योग्य उपचार वेळेत मिळावे म्हणून जवळपास एक एकर परिसरात रुग्णालयासाठी जागा उपलब्ध आहे परंतु त्या जागेचा योग्य वापर होता नाही सरस पणे गैरवापर होताना दिसून येत आहे सुरुवातीला याठिकाणी रुग्णालयासह कर्मचाऱ्यांना साठी वसाहत होती परंतु सध्या जुने रुग्णालय व कर्मचारी वसाहतीसाठी असणारे बरेच जुने झाली असून या ठिकाणी कोणीच राहत नाही तर जुने रूग्णालय सुद्धा जुन्या अवस्थेत असल्यामुळे शासनाने सन 2010 ते 2011 दरम्यान याची बांधकाम केले परंतु या ठिकाणी जनावरांसाठी पायाभूत सुविधा दिसून येत नाहीत त्यात जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची  व्यवस्था नसून जनावरांना उन्हापासून किंवा पावसापासून बचावासाठी कुठलाच निवारा नाही तसेच जनावरांना योग्य वेळेत उपचार मिळावे यासाठी पुरेसे कर्मचारी संख्याबळही नाही



प्रतिनिधी शुभम तुपकरी - हदगांव

Post a Comment

0 Comments