-->

Ads

प्राथमिक आरोग्य केंद्र कापडसिंगी येथे रुग्ण कल्याण समिती बैठक संपन्न







 दिनांक 9 सप्टेंबर 2019 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र कापडसिंगी येथे रुग्ण कल्याण समितीची बैठक सन्मानीय जिल्हा परिषद सदस्य श्रीमती चंद्रभागा बाई देवराव जाधव मॅडम व माननीय तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सतीश रुणवाल सर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
या बैठकीमध्ये मागील झालेल्या खर्चाचे वाचन करण्यात आले व पुढील एक वर्षाची नियोजन करण्यात आले या बैठकीमध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले, डिलिव्हरी झालेल्या मातांना जेवण देणे, आज रोजी प्राथमिक आरोग्य केंद्रात या महिन्यात 9 डिलिव्हरी झाले आहेत, PPIUCD जे काम 40 टक्के एवढे झाले आहे. दुर्गम भागात अतिशय चांगले काम होत असल्याने समितीने अभिनंदन करून समाधान व्यक्त केले यावेळी कापडसिंगी येथे दोन आरोग्य कर्मचारी धानोरा व चिखलागर येथे दिल्याबद्दल समितीचे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब व माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी साहेब यांचे आभार व्यक्त करून समाधान व्यक्त केले तसेच समितीने हात्ता आरोग्य उपकेंद्र येथे नियमित आरोग्य सेविकेची मागणी केली,
तसेच यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सतीश रुणवाल सर यांनी शासनाच्या विविध योजना जननी सुरक्षा योजना, बुडीत मजुरी, मानव विकास मिशन अंतर्गत दिल्या जाणाऱ्या सर्व  सेवाची माहिती समितीला दिली. त्याचबरोबर प्राथमिक आरोग्य केंद्राला लागणारे साहित्य गादी ,पलंग, पंखा, चेअर इत्यादी साहित्य लोकसहभागातून देण्याचे आव्हान डॉक्टर सतीश रुणवाल सर यांनी उपस्थित सर्व सन्माननीय पदाधिकारी व कर्मचाऱ्यांना केले, तसेच 14 व्या वित्त आयोगाच्या निधीमधून काही निधी प्राथमिक आरोग्य केंद्राला खर्च करण्याचे आश्वासन कापडसिंगी चे सरपंच बालाजी लक्ष्मणराव हराळ यांनी दिले, यावेळी बैठकीचे प्रस्थापित श्री पायघन यांनी केले तर आभार मारोतराव पोले यांनी मानले.
या बैठकीला सन्मानीय अध्यक्ष चंद्रभागाबाई देवराव जाधव मॅडम, माननीय तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सतीश रुणवाल सर, पंचायत समिती सदस्य खुशालराव हराळ, दशरथ साबळे, सुदाम मानवतकर ,चेअरमन नारायण हराळ ,
जनाबाई तनपुरे, पत्रकार संतोष हराळ, उपसरपंच गोविंदराव साबळे, ाजी पंचायत समिती सदस्य अशोकराव सानप, माजी सरपंच ग्‍यानोजी तनपुरे ,प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जगन्नाथ काकडे , डॉक्टर पारीसकर ,आरोग्य सहाय्यक दिलीप काकडे ,सखाराम साबळे ,श्री वाढवे ,व आरोग्य कर्मचारी मारोतराव पोले, श्री प्रताप साबळे, श्री वाढेकर, श्री गरपाळ,श्री माळवदे ,वाहनचालक श्री पवार,pls पंजाब चव्हाण, तसेच आरोग्यसेविका श्रीमती गणेश, श्रीमती गुडदे, ए. आर .ठोके, आय, पी ,जामनिक आदी कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments