पाण्यासाठी नगरसेवकाचे अधिकाऱ्यांच्या टेबलावर झोपून आंदोलन
टेबलावर बसूनच दिले मजीप्राच्या अधिकाऱ्याला निवेदन
बदलापूर
येथील एरंजाड आणि सोनिवली या भागात गेल्या वीस दिवसांपासून अनियमित आणि कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने येथील नागरिक पाण्यावाचून हैराण झाले आहेत. त्यांनी स्थानिक भाजपाचे नगरसेवक हेमंत चतुरेे यांच्यासह महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या बेेलवली येथील कार्यालयात धडक दिली. यावेळी उपस्थित असलेल्या उपकार्यकारी अभियंता सुहास मगदूम यांच्या टेबलवर नगरसेवक हेमंत चतुरे यांनी झोपूून आंदोलन केले. टेबलावर बसूनच त्यांनी अभियंत्यांना निवेदन दिले. जोपर्यंत पाणी मिळत नाही तोपर्यंत टेबलवरून उठणार नाही अशी भूमिका घेतल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची झोप उडाली. नगरसेवक हेमंत चतुरे यांच्या आक्रमक पावित्र्यामुळे बदलापुरातील पाणीटंचाईच्या झळा किती तीव्र झाल्या आहेत हे दिसून येते. हेमंत चतुुरे हे कोणतेही कारण ऐकून घेण्यास तयार नसल्याने पहिले पाणी द्या मगच टेबला वरुन उठू अशी भूमिका घेतल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी हतबल झाले होते. त्यांनी हेमंत चतुरे यांना वारंवार विनंती केली. अखेर या भागात तातडीने पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर हेेेे आंदोलन मागे घेतले.
उस्मान शाह, बदलापूर

0 Comments