-->

Ads

उल्हासनगरात हातभट्टी दारूच्या 22 रबरी ट्यूब जप्त पोलिसांनी केली एकाला अटक




उस्मान शाह, उल्हासनगर


        लोकसभा निवडणुकीत देशी विदेशी दारूच्या विक्रीने जोर पकडला असतानाच उल्हासनगर गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी हातभट्टी दारूच्या साठ्याच्या तब्बल 22 रबरी ट्यूब जप्त केल्या आहेत. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.
           विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या माणेरे गावात एका इसमाने त्याच्या घराच्या समोर हातभट्टी दारूचा बेकायदा साठा विक्रीसाठी साठवून ठेवल्याची माहिती गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस आयुक्त बाजीराव भोसले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाखा झेंडे, उपनिरीक्षक गणेश तोरगल, गिरीश गायकवाड, संतोष धाडवे यांनी पथकासोबत माणेरे गावात धडक दिली असता नितीन फुलोरे याने त्याच्या घरासमोर हातभट्टी दारूचा तब्बल 22 रबरी ट्यूब मध्ये साठा करून ठेवल्याचे निदर्शनास येताच नितीन फुलोरे याला अटक करून साठा जप्त करण्यात आला.
           जप्त करण्यात आलेल्या 22 ट्यूब मध्ये 880 लिटर हातभट्टीची दारू असून त्याची किंमत 66 हजार रुपये आहे. या साठ्याची विल्हेवाट लावण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांनी दिली.


Post a Comment

0 Comments