-->

Ads

उल्हासनगरात पूर्ववैमनस्यातून 16 वर्षीय मुलाचा खून

पोलीस पथके घेताहेत फरार आरोपीचा शोध





उस्मान शाह, उल्हासनगर

         महिन्याभरापूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून एका तरुणाने 16 वर्षीय अल्पवयीन मुलाचा खून केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी रात्री उल्हासनगरात घडली आहे.
          उल्हासनगर कॅम्प 2 मधील आझादनगर परिसरात 23 वर्षीय बिपीन यादव व 16 वर्षीय सुंदरम निशाद राहतात. एका महिन्यापूर्वी सुंदरमने बिपीनला मारहाण केली होती. तेव्हा पासून बिपीन हा सुंदरमचा वचपा काढण्याच्या बेतात होता. मंगळवारी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास सुंदरम हा आझादनगरातील बुद्धनगर चौकात आला असता बिपीन याने धारदार शस्राने वार करून सुंदरमचा खून केला.
           याबाबत सुंदरम याचा मोठा भाऊ संजय निशाद याने दिलेल्या तक्रारीवरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशील जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.जी.माने यांनी बिपीन यादव याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी बिपीन फरार झाला आहे. त्याला पकडण्यासाठी पथके विविध ठिकाणी रवाना करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशील जावळे यांनी दिली.

उस्मान शाह, उल्हासनगर

Post a Comment

0 Comments