ठाणे - पालघर लोकसभा मतदार संघातून अखेर राजेंद्र गावित यांना उमेदवारी
प्रतिनिधी : उस्मान शाह
पालघर लोकसभेसाठी पालघर मतदार संघातून कोणाला उमेदवारी देण्यात येणार याबाबत राज्यभरात चर्चा रंगल्या असताना ही जागा भाजपचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांना देण्यात आली आहे. राजेंद्र गावित यांना शिवसेनेत प्रवेश देण्यात आला आहे. पालघर लोकसभा जागेवर येत्या २४ तासात निर्णय घेणार अशी माहिती ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी दिली होती. याबाबत पत्रकार परिषद घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही माहिती दिली. हा निर्णय युतीचा आहे असे देखील उद्धव ठाकरे म्हणाले.
श्रीनिवास वनगा यांची स्वतःहुन माघार -
यावेळी बोलताना वनगा म्हणाले ,”लोकसभा निवडणूक मी स्वतःहुन न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मी खासदारकीसाठी नाही तर आमदारकीसाठी उभा राहणार आहे. असे स्पष्ट केले. तसेच त्यांना कोणत्याही परिस्थितीत विधिमंडळात पाठवल्याशिवाय राहणार नाही अशी ग्वाही उद्धव ठाकरे यांनी दिली.
WWW..3DNEWS.IN

0 Comments