-->

Ads

उर्मिला मातोंडकर करणार काँग्रेसमध्ये प्रवेश? 'या' जागेवर लढणार निवडणूक - सूत्र

उत्तर मुंबई लोकसभा भाजपाकडून या आधीच गोपाळ शेट्टी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात आता काँग्रेस उर्मिला मातोंडकर यांच्या नावाची चर्चा करत असल्य़ाचं सांगण्यात येत आहे.



मुंबई, 25 मार्च : रंगीला चित्रपट फेम प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्या नावाची उमेदवारीसाठी चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेस पक्षाकडून उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातून उर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
उत्तर मुंबई लोकसभा भाजपाकडून या आधीच गोपाळ शेट्टी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात आता काँग्रेस उर्मिला मातोंडकर यांच्या नावाची चर्चा करत असल्य़ाचं सांगण्यात येत आहे. उर्मिला मातोंडकर यांचा काॅग्रेस प्रवेश करून तिकीट देण्यासाठी काॅग्रेस पक्षाच्या हालचाली सुरू झाला असल्याचंही सांगण्यात येत आहे. पण याच मतदार संघातून आसावरी जोशी आणि शिल्पा शिंदे या उमेदवारीसाठी आग्रही आहे अशाही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे यावर आता काँग्रेस अधिकृतरित्या काय माहिती देतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.राजकारणातील वादग्रस्त अभिनेत्री करणार भाजप प्रवेश?
लोकसभेसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. आगामी लोकसभेसाठी भाजपने अनेक कलाकार आणि खेळाडूंना संधी दिली आहे. यातच अभिनेत्री आणि समाजवादी पार्टीच्या नेत्या जयाप्रदा यासुद्धा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
अभिनेत्री ते नेता असा प्रवास केलेल्या जया प्रदा यांनी जानेवारीमध्येच खासदार अमर सिंग आपले गॉडफादर असल्याचे म्हटले होते. तसेच जरी मी त्यांना राखी बांधली तरी लोक चर्चा करणे थांबवणार नाहीत असंही त्या म्हणाल्या होत्या.

Post a Comment

0 Comments