साताऱ्यात टोल नाक्यावर गोळीबार, तब्बल 7 राऊंड फायर
गोळीबार केलेली वाहने पुण्याचा दिशेला गेल्याचं CCTV मध्ये कैद झालं आहे. त्यापद्धतीने आता पोलीस पुढील तपास करत आहेत.सातारा, 25 मार्च: साताऱ्यातील आनेवाडी टोलनाक्यावर गोळीबार झाला आहे. टोलचे पैसे देण्याच्या वादातून गोळीबार करण्यात आल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या वादावादीमध्ये तब्बल 7 राउंड फायर झाल्याचं सांगण्यात येत आहे. तर एक जण यामध्ये जखमी झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पण गोळीबार केल्यानंतर हल्लेखोरांनी पळ काढला. गोळीबार केलेली वाहने पुण्याचा दिशेला गेल्याचं CCTV मध्ये कैद झालं आहे. त्यापद्धतीने आता पोलीस पुढील तपास करत आहेत. पण टोलनाक्यावर अशा पद्धतीने गोळीबार झाल्यामुळे नागरिकांची सुरक्षा राम भरोसे आहे असं म्हणायला हवं.दरम्यान, या घटनेमध्ये काही हल्लेखोर हे नामचीन गुंड असल्याचं सांगण्यात येत आहे. तर सीसीटीव्हीमध्ये दिसल्याप्रमाणे आरोपींच्या शोधासाठी पोलीस आता पुण्याच्या दिशेने रवाना झाले आहेत.
या गोळीबारामध्ये टोल नाक्यावरील एक कर्मचारी जखमी झाला आहे. त्याच्यावर नजिकच्या स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर गोळीबार करणाऱ्या या कारमध्ये 5 ते 6 जण असल्याची माहिती इतर कर्मचाऱ्यांकडून देण्यात आली आहे.
सुरुवातीला गोळीबाराचा आवाज ऐकल्यानंतर टोलनाक्यावर धावपळ सुरू झाली. तब्बल 7 गोळ्या झाल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून सुसाट पळ काढला. नेमकी ही पिस्तुल कोणाची आहे. पिस्तुलीचं लायसन्स आहे का याची आता पोलीस चौकशी करत आहे.
0 Comments