लग्नाचं खोटं वचन देत तरुणीवर वारंवार केला बलात्कार; दोनदा करावं लागलं अॅबॉर्शन
ही 28 वर्षीय पीडित तरुणी शिक्षिका आहे आणि ती या आरोपी तरुणाला 2012 मध्ये फेसबुकच्या माध्यमातून भेटली.

एवढंच नाही तर या आरोपी तरुणाने तिचा आक्षेपार्ह व्हिडिओ तयार केला आणि तो व्हिडिओ सगळ्यांना दाखवीन अशी धमकी देत तो तिच्यावर बलात्कार करत राहिला.
ही 28 वर्षीय पीडित तरुणी शिक्षिका आहे आणि ती या आरोपी तरुणाला 2012 मध्ये फेसबुकच्या माध्यमातून भेटली. ते फेसबुक फ्रेंड्स होते आणि नंतर त्याने तिला लग्नाची मागणी घातली. आपण लग्न करू, असं सांगत मुंबईत पार्ल्याच्या एका हॉटेलमध्ये तिच्यावर बलात्कार केला.आपल्या लग्नाविषयी घरच्यांना सांगण्याचा आग्रह तरुणीने सुरू केल्यावर या आरोपी तरुणाने ते सतत लांबणीवर टाकलं. उलट वारंवार तिच्याबरोबर शरीरसंबंध ठेवण्याची जबरदस्ती केली. या सगळ्यात 2015 मध्ये तिला दिवस गेले. त्या वेळी तिला जबरदस्तीने मूल पाडायला लावलं. पुन्हा एकदा 2017 मध्येही ती गरोदर राहिल्यावर तिला अॅबॉर्शन करायला लावलं.
शेवटी या तरुणीने त्याच्या घरच्यांशी संपर्क साधला. पण त्यांनी उलट तिलाच धमकी दिली आणि शिवीगाळ केला.
या तरुणीने अखेर विलेपार्ले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलीस या प्रकरणी आणखी चौकशी करत आहेत. पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.
0 Comments