सोशल मीडियावरच्या मुद्यावरून हायकोर्टानं केंद्रीय निवडणूक आयोगाला फटकारलं
सोशल मीडियाच्या मुद्यावरून हायकोर्टानं केंद्रीय निवडणूक आयोगला फटकारलं आहेमुंबई, 26 मार्च : सोशल मीडियावर अंकुश ठेवण्यासाठी नियमावली नाही. त्यामुळे आम्हीच योग्य तो निर्णय घेऊ अशा शब्दात केंद्रीय निवडणूक आयोगाला हायकोर्टानं फटकारलं आहे. लोकसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करताना निवडणूक आयोग सोशल मीडियावर देखील लक्ष ठेवणार असून त्याच्या खर्चाचा तपशील देखील निवडणूक आयोगाकडे सादर करावा लागणार असल्याचं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं होतं. शिवाय, काही तक्रारी असल्यास देखील त्या ऑनलाईन दाखल करता येणार असल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं होतं. दरम्यान, सोशल मीडियावर अंकुश ठेवण्यास निवडणूक आयोगाकडे नियमावली नसल्याचं म्हणत आता मुंबई हायकोर्टानं केंद्रीय निवडणूक आयोगाला फटकारलं आहे. शिवाय, आम्हीच काय तो निर्णय घेऊ असं म्हटलं आहे.निवडणुकांसाठी करोडोंचा खर्च
यावर्षी निवडणुकांसाठी 2014च्या तुलनेत दुप्पट खर्च येणार आहे. होय, ही गोष्ट खरी आहे. 2014मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीकरता 35,547 कोटी रूपये खर्च करण्यात आले होते. पण, 2019मध्ये तब्बल 50 ते 60 हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. सात टप्प्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकांचा निकाल 23 मे रोजी लागणार आहे. त्यामुळे सर्वांचं लक्ष आता निवडणुकांच्या निकालाकडे लागून राहिला आहे. निवडणूक तारखांची घोषणा झाल्यानंतर लगेचच आचारसंहिता देखील लागू करण्यात आली आहे.
0 Comments