ITI केलेल्यांसाठी खुशखबर, माझगाव डॉक कंपनीत मेगाभरती
माझगाव डॉकयार्डमध्ये आयटीआय क्षेत्रातील लोकांसाठी विविध पदांची भरती काढण्यात आली आहे. जवळपास 750 हून जास्त जागांची भरती काढण्यात आली आहे. जाणून घ्या नेमक्या किती आणि कोणत्या ट्रेडसाठी जागा आहेत. भारत सरकारचा उपक्रम म्हणून ओळखली जाणारी माझगाव डॉक कंपनीने वर्षाच्या शेवटला आयटीआय विद्यार्थांसाठी आणि कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. माझगाव डॉक कंपनीमध्ये अनेक वेगवेगळ्या ट्रेडमधील लोकांसाठी काही जागा आणल्या आहेत.आयटीआय केलेल्यांसाठी एकूण 798 जागा कंपनीने आणल्या आहेत. यामध्ये कंपोझिट वेल्डरसाठी 228 जागा आहेत. तर ड्राफ्टसमन आणि इलेक्ट्रिक क्रेन ऑपरेटरसाठी 28 जागांची भरती आहे. त्याचबरोबर फिटर आणि मशिनिस्ट ट्रेडसाठी 20 जागा आहेत. इलेक्ट्रिशिअन 44 आणि इलेक्ट्रॉनिक मॅकॅनिक 12 जागा आहेत.माझगाव डॉक ही कंपनी जहाज बनवणारी असल्याने इथे सगळ्याचं प्रकारचे आयटीआय ट्रेड लोकांची आवशक्यता असते. स्ट्रकचरल फॅब्रिकेटर पदासाठी 187 जागा आहेत. तर स्टोअर किपरसाठी 15 जागा आहेत. ड्राईव्हर आणि पाईप फिटरसाठी 8 जागा आणि क्वालिटी इन्स्पेक्टर पदासाठी 7 जागा आहेत.यासर्व पदांसाठी अर्ज करण्यासाठी तुम्ही पात्र असायला हवेत. यासाठी वेगवेगळ्या ट्रेडनुसार शैक्षणिक अट ठेवण्यात आली आहे. आठवी, दहावी, आणि बारावीच्या गुणवत्तेवर तुमची निवड केली जाईल. तसेच या पदांसाठी अर्ज करताना आयटीआयचे प्रमाणपत्र बंधनकारक आहे.
यासर्व पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 डिसेंबर आहे. तसेच फॉर्म भरण्याची सर्व प्रक्रिया ऑनलाईन केली जाईल. फॉर्म भरण्यासाठी Mazagondock.in या वेबसाईटवर जाऊन Career Executive किंवा Non Career Executive यावर क्लिक करावे. त्यानंतर पुढील प्रक्रिया वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार करावी.
0 Comments